मुंबई

मीरा भाईंदर आमदारांच्या नावे बनावट ऑडिओ क्लिप व्हायरल! पोलिसांत गुन्हा दाखल

संदीप पंडित


मिरा रोड ः  मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या नावाने सोशल मिडियावर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी केंद्र तसेच राज्य शासनावर टीका करून संशयित कोरोना रुग्णांना पॉझिटिव्ह ठरविण्याचा धंदा सुरू असल्याचा आरोप केला आहे. या क्लिपमुळे शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून जैन यांनी ही ऑडिओ क्लिप बनावट असल्याचा व्हिडीओ सादर करीत त्याविरोधात नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जैन यांच्या नावे एक ऑडिओ क्लिप शनिवारी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली. त्यात त्यांनी कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी केंद्र शासनाने दिड लाख रुपये मंजूर केल्याचे सांगून त्यासाठी खाजगी डॉक्टर, पॅथॉलॉजी लॅब द्वारे जास्तीत जास्त रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह ठरविण्याचे निर्देश देण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे सर्दी, ताप, खोकला आदी आजाराने त्रस्त रुग्णांना कोरोना पॉजिटीव्ह ठरवून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा धंदा सुरू असल्याचे म्हटले आहे.

केंद्राकडून दिड लाखांच्या उपचार खर्चाला मंजुरी मिळताच त्या रुग्णांना बरे ठरवून घरी पाठविले जाते. हे बंद करण्याकरीता रुग्णांनी डॉक्टर व लॅबमध्ये कोरोना टेस्टसाठी न जाता घरीच राहुन घरगुती उपचार करण्याचा सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला आहे. लोकांनी याला बळी पडू नये व दुसऱ्यालही बळी पाडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. काही बड्या असामी कोरोनाच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकळत असताना केंद्र व राज्य शासन मात्र एकमेकांवर जबाबदारी झटकत आहेत. त्यांना लोकांची काळजी नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःची काळजी स्वतःच घ्यावी, यासाठी हा संदेश पाठवीत असल्याचे त्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

त्याची गंभीर दखल घेत जैन यांनी हे घाणेरडे राजकारण काही नतभ्रष्ट नेत्यांच्या सांगण्यावरून आपल्याला बदनाम करण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या विरोधात त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. 

---------------------------------------------------------------

संपादन - तुषार सोनवणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT