मुंबई

मुंबईत तिसऱ्यांदा होणार सिरो सर्व्हे,  वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे होणार ऑडिट

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 28 : भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोविड19 सिरो सर्व्हे 3 सुरू केला असून यामधून वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येत आहे. या सर्व्हेनंतर कोरोना प्रतिबंधात्मक लसिकरणाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे हा सर्व्हे जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय आयसीएमआरने घेतला आहे.  

गुरूवारपासून या सर्व्हेला सुरूवात झाली असून जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत सर्व्हे पुर्ण करण्यात येणार आहे. या सर्व्हेच्या माध्यमातून 70 जिल्ह्यांतील 29 हजार लोकं तसेच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची तपासणी केली जाणार आहे. दुसरा सिरो सर्व्हे केलेल्या ठिकाणीच हा सर्वे केला जाणार आहे. हा सिरो सर्व्हे अत्यंत महत्वाचा असून यामुळे लसिकरणाची सर्वाधिक गरज कुणाला आहे ते ठरवण्यास मदत मिळणार असल्याचे आयसीएमआर संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ समिरन पांडा यांचे म्हणणे आहे.  

दुसऱ्या सिरो सर्व्हमध्ये 10 वर्षांवरील मुलांच्या संसर्गाबाबत अभ्यास करण्यात आला होता. सिरो सर्व्ह 3 मध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांमधील संसर्गाचे प्रमाण समजण्यास मदत मिळणार असून त्यामुळे लसिकरणाची प्राथमिकता ठरवण्यास संबंधित विभागाला मदत मिळणार आहे. हे सर्वेक्षण करणार्‍या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. मनोज मुर्हेकर म्हणाले, मोठ्या लोकसंख्या असणाऱ्या परिसरातील संक्रमण आणि रोगप्रतिकारक शक्तीचे प्रमाण समजून घेणे हे उद्दीष्ट आहे. "तिसर्‍या सर्वेक्षणातील निकाल पुढील वर्षी लसिकरणापूर्वी उपलब्ध होतील,” असे ही डॉ. मुर्हेकर यांनी पुढे सांगितले. 

दुसरा सिरो सर्व्ह हा तरूणांमधील संसर्गाचे प्रमाण जाणून घेण्यासाठी करण्यात आला होता. देशातील 7 टक्के तरूण ऑगस्टच्या समाप्तीपूर्वी कोरोना व्हायरसच्या संपर्कात आले असावेत असा निष्कर्ष दुसर्‍या सिरो सर्व्ह केलेल्या संशोधकांनी काढला. हा अभ्यास 17 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर दरम्यान करण्यात आला होता.

( संपादन - सुमित बागुल )

audit of health workers will be done through third sero survey in mumbai

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT