मुंबई

मुंबईकरांचा प्रवास महागणार का ? आज रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीवर होणार निर्णय

प्रशांत कांबळे

मुंबई, ता. 21 : मुंबईकरांचा रिक्षा, टॅक्सी प्रवास ऐन कोरोना काळात वाढण्याची शक्यता काही दिवसांपासून वर्तविण्यात येत होती. तर प्रवासी आणि टॅक्सी, रिक्षा संघटनांमध्येही संभ्रम निर्माण झाले होते. हा संभ्रम आज दूर होणार असून, मंत्रालयात पार पडणाऱ्या मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरण (एमएमआरटीए) च्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावावर चर्चा करण्यात येणार असून, राज्य सरकार भाडेवाढ करणार असल्याचे संकेत खुद्द परिवहन मंत्र्यांनी दिले आहे.

अनेक वर्षांपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ झाली नाही. कोरोना काळात रिक्षा आणि टॅक्सी याचे खूप हाल झाले आहेत. त्यामुळे टॅक्सीसाठी ३ रुपये प्रति किमी आणि रिक्षासाठी २ रुपये प्रति किमी वाढण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यासंबंधित प्रस्ताव सुद्धा परिवहन विभागाने राज्य सरकारला पाठवला असून त्यावर अंतिम निर्णय आज होण्याची शक्यता आहे.

या बैठकीत एमएमआरटीएचे अधिकारी परिवहन आयुक्त आणि वाहतूक पोलिसांचे अधिकाऱ्यांसह राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत यावर चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता परिवहन विभागातील एका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

auto rickshaw fare to increase in mumbai important meeting in mantralaya 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Orange Cap : नाद करा, या पोरांचा नको... यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशीने 'ऑरेंज' कॅप शर्यतीत रोहितला मागे सोडले;Top Five List

RR vs MI Live: युवा जोश, उडवली मुंबईची झोप! यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी यांची दे दणादण फटकेबाजी; ११ षटकांत १५० धावा...

RR vs MI Live: हटा सावन की घटा... वैभव सूर्यवंशीचा तोरा... जसप्रीत बुमराहचा पहिलाच चेंडू षटकार, ३ चेंडूंत कुटल्या १३ धावा, Video

Manoj Jarange: मनोज जरांगेंनी टाळलं अन् धनंजय मुंडे हेलिकॉप्टरने पोहोचले; महंत म्हणाले, सर्वांना सोबत घेऊन चालण्याची परंपरा...

Rice Export : तणावातही भारतीय तांदळाला इराणमध्ये मागणी; युद्धजन्य परिस्थितीवर मात करत उलाढाल, ६५ लाख टन निर्यातीचा अंदाज

SCROLL FOR NEXT