doctor. 
मुंबई

कोरोनाविरोधात लढणाऱ्या डॉक्टरांना तीन महिने वेतनच नाही! 

संतोष पेरणे

नेरळ  ः आपल्या जीवाची पर्वा न करता रायगड जिल्ह्यातील कोव्हिड सेंटरमध्ये सेवा बजावणाऱ्या 36 डॉक्‍टरांचे मागील तीन महिन्यांपासून मानधन शासनाकडून अद्यापही देण्यात आलेले नाही. त्यामुळे डॉक्‍टरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. 

रायगड जिल्ह्यात अशाच 36 डॉक्‍टरांची शासनाने आरोग्य वर्धिनी रुग्णालयात आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली. मात्र रायगड जिल्हा प्रशासन त्यांच्याकडे डॉक्‍टरांना कोविड केअर सेंटरची जबाबदारी दिली. 11 महिन्यांचे करारावर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हे सर्व डॉक्‍टर कार्यरत आहेत. त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत दरमहा 25 हजारांचे मानधन आणि 15 हजारांचा भत्ता देण्यात येईल, असे लेखी शासनाकडून देण्यात आले आहे. मात्र मागील मे, जून, जुलै या तीन महिन्यांचे मानधनच देण्यात आलेले नाही. 


मागील तीन महिन्यांपासून पगार झाला नसल्याने या 36 कंत्राटी डॉक्‍टरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात नियुक्तीवर आलेले काही डॉक्‍टर हे अन्य जिल्ह्यांतील देखील आहेत. ते येथे भाड्याने घर घेऊन राहात आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्याने घराचे भाडे कसे द्यायचे, याची चिंता त्यांना लागली आहे. 


आरोग्य सभापती यांची सूचना आली असून आम्ही जिल्ह्यातील सर्व 36 कंत्राटी डॉक्‍टरांची माहिती मागविली आहे. ती प्राप्त होताच त्यांचा पगार केला जाणार आहे. 

- सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगड जिल्हा परिषद. 

 

त्या सर्व डॉक्‍टरांचा पगार करण्यात कोणत्याही अडचणी नाहीत. याबाबत तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना सूचना केल्या आहेत. 
- सुधाकर घारे, सभापती, आरोग्य समिती, रायगड जिल्हा परिषद. 
 

Awaiting salary of 36 doctors in Raigad district

( संपादन ः रोशन मोरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard Attack : कुत्र्यांनी वाचवले मालकाचे प्राण! मेंढपाळांवर बिबट्याचा हल्ला; मात्र कुत्र्यांनी केलेला हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू

Thane Traffic: बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न! मार्गावर तब्बल ८०० खड्ड्यांच साम्राज्य

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Pune News : पतीला अर्ध यकृत दिल, प्रत्यारोपणनंतर पत्नीसह दोघांचाही मृत्यू; पुण्यातील रुग्णालयात घटनेने खळबळ

दोन महिन्यात उजनीतून सोडले 97 TMC पाणी! उजनी धरणाचे 16 दरवाजे 3 फुटाने उघडले; भीमा नदीतील विसर्ग 45 हजार क्युसेक, पंढरीतील पूरस्थिती आज पूर्वपदावर

SCROLL FOR NEXT