ayodhya ram mandir inauguration ceremony mumbai dabbawala celebrate diwali Sakal
मुंबई

Ayodhya Ram Mandir : अयोध्या येथील श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळ्यानिमित्त डबेवाले दिवाळी साजरी करणार

अयोध्या येथील श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश उजळून निघाला आहे.मुंबईचा डबेवाल्यांचा आनंद ही द्विगुणीत झाला असून सोमवारी राम मंदिर उदघाटन सोहळ्यादरम्यान दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मुंबई डबेवाला संघटनेने घेतला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : अयोध्या येथील श्री राम मंदिराचा उदघाटन सोहळ्यानिमित्त संपूर्ण देश उजळून निघाला आहे.मुंबईचा डबेवाल्यांचा आनंद ही द्विगुणीत झाला असून सोमवारी राम मंदिर उदघाटन सोहळ्यादरम्यान दिवाळी साजरी करण्याचा निर्णय मुंबई डबेवाला संघटनेने घेतला आहे.

मुंबाईचा डबेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी याबाबत माहिती देतांना सांगितले की,राम आमचा श्वास आहे. राम आमचा ध्यास आहे.आम्ही एकमेकाला भेटलो की अभिवादन करताना " रामकृष्ण हरी" मंत्र म्हणतो, या मंत्रा मध्येही राम आहे. राम सर्व व्यापी आहे. अशा या श्रीरामप्रभूचे अयोध्येत रामजन्मभुमीवर भव्यदिव्य असे राम मंदीर साकारते आहे याचा आनंद आम्हाला आहे. २२ जानेवारी रोजी आम्ही पुन्हा एकदा दिवाळी साजरी करणार आहे.

राम मंदिर व्हावे ही सर्वांचीच इच्छा होती. तिला आज मूर्त रूप मिळत आहे.याच डोळा याच देही रामजन्मभुमी मंदीरा मध्ये मुर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा पहायला मिळणार आहे. हे आमचे मोठे भाग्य आहे. गेली ५२५ वर्ष रामजन्मभुमी मंदीर हा वाद होता तो वाद मिटला व रामजन्मभुमीवर भव्यदिव्य श्रीरामाचे मंदार उभे रहात आहे याचा आनंद प्रत्येक हिंदूला तसा आम्हाला ही आहे.

सोमवारी डबेवल्याना ही सुट्टी देण्यात आली आहे. सर्वांना या दिवशी घराघरात आनंदोत्सव साजरा करण्यास सांगण्यात आले आहे. काही डबेवाले मुंबईतील भायखळा परिसरात एकत्र जमून आनंद साजरा करणार आहेत. विदेशी आक्रमकांनी हिंदूची प्रमुख श्रध्दास्थान अयोध्दा, मथुरा,

काशी येथील मंदीरे उध्दवस्त केली आणी तेथे मशीदी बांधल्या अयोध्दा आता मुक्त झाली आहे तेथे रामजन्मभुमीवर मंदीर उभे राहीले आहे आता आम्हाला वेध लागले आहेत ते मथुरा, काशी मुक्तीचे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली अयोध्दा जशी मुक्त झाली त्याच प्रमाणे मथुरा, काशी सुध्दा मुक्त होतील अशी आम्हाला आशा आहे असे सुभाष तळेकर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran US Conflict : अमेरिकेला इराणचे थेट आव्हान; ‘युद्धाची खरंच तयारी असेल तर जमिनीवर सैन्य उतरवा’

Neighboring Countries: शेजारील देशांना एकाच पारड्यात तोलू नका

Realme Smartphone: हॅरी पॉटर चाहत्यांसाठी खूशखबर! Realme 16 Proचे लिमिटेड एडिशन Flipkartवर होणार लाँच; पाहा फीचर्स!

S Jaishankar SIR Notice : परराष्ट्रमंत्री जयशंकर, सीबीआय संचालक, माजी लष्करप्रमुखांच्या कुटुंबीयांना SIR नोटीस; नेमकं प्रकरण काय?

IND A vs AUS A: CSK चा माजी स्टार खेळाडू आता भारतीय संघाचा हेड कोच! ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऋतुराज-पडिक्कलच्या संघांना देणार ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT