ayodhya ram mandir inauguration thane places innovative programs esakal
मुंबई

Ayodhya Ram Mandir : श्री राम प्राणप्रतिष्ठापना निमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमाची पर्वणी

ठाणे तलावांचे शहर, ठाणे संस्कृतीचे शहर असल्याने ठाणे नगरीत मोठ्या प्रमाणात विविध सण साजरे करण्यात येतात. अयोध्यात राममंदिरात मूर्तिची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (ता-२२) रोजी एक दिवस अगोदर पासूनच ठाण्यात "जय श्रीराम"च जागर सुरू झाला.

सकाळ वृत्तसेवा

Thane News : ठाणे तलावांचे शहर, ठाणे संस्कृतीचे शहर असल्याने ठाणे नगरीत मोठ्या प्रमाणात विविध सण साजरे करण्यात येतात. अयोध्यात राममंदिरात मूर्तिची प्राणप्रतिष्ठा सोमवारी (ता-२२) रोजी एक दिवस अगोदर पासूनच ठाण्यात "जय श्रीराम"च जागर सुरू झाला. अवघे ठाणे शहर भगवामय झालेले आहे.

भजन, कीर्तन, पूजापाठ, रथयात्रा, महाआरती अशा कार्यक्रमाची पर्वणी सुरू आहे. या संस्कृतीमय ठाणे शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून ठाणे पोलिसांनी ३ हजार मनुष्यबळाचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

रविवारीच (ता-२१) ठाणे भगवामय झाले. तलावपाळी येथे पूजाअर्चा, कोपीनेश्वर मंदिरात महाआरती, राजकीय पक्षाची रेली, उपवन येथे महाआरती, रथयात्रा आदिने ठाणे शहर संस्कृतीचे माहेरघर झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

राममूर्ति प्रतिष्ठापनामुले बाजारातही तयारीची लगबग मागील काही दिवसापासून सुरूच होती. आजही बाजार फुललेलाच आहे. मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात गल्लोगल्ली कार्यक्रम, महाआरतीच जागर सुरू झाला. भगवे होर्डिंग, भागव्य झालर, विद्युत रोषणाई, भजन कीर्तनाचे सजलेले मंडप, प्रत्येक विद्युत पोळवर भगवे झेंडे, प्रत्येक दुकानदाराने दुकानात प्रथमदर्शनी भगवे लावलेले कंदील यामुळे ठाण्यात भगवी दिवाळीचे चित्र पहायला मिळाले.

ठाणे पोलिसांचा चोख बंदोबस्त

भक्तीमय वातावरणात बुडालेल्या ठाणे शहरात असामाजिक तत्वांद्वारे कुठलाही अनिचीत प्रकार घडू नये, सर्व कार्यक्रम शांततेत पार पडावे यासाठी ठाणे आयुक्ताल्याच्या हद्दीत तब्बल ३ हजार मनुष्यबळाचा चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

या बंदोबस्तात पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक, यांच्यासह पोलिस अमलदार, कर्मचारी आणि २ राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या ठाणे आयुक्तल्याच्या पाच परिमंडळात तैनात करण्यात आल्या आहेत. ठाणे पोलिसांनी आयुक्तालयाच्या हद्दीतील रथयात्रा, भजन-कीर्तनाचे मंडप, महाआरत्या, यांच्यावर विशेष लक्ष केन्द्रित करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

ठाणे पोलिसांचा बंदोबस्त

  • पोलिस उपायुक्त ०९

  • सहाय्यक पोलिस आयुक्त १६

  • पोलिस निरीक्षक, सहय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उप निरीक्षक -३५०

  • पोलिस महिला-पुरुष कर्मचारी २५००

  • एसआरपीच्या तुकड्या ०२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

SCROLL FOR NEXT