ayodhya ram mandir procession in thane as well naresh mhaske politics sakal
मुंबई

Thane News : ठाण्यातही निघणार श्रीराम मंदिर प्रतिकृतीची मिरवणूक - नरेश म्हस्के

- शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के : ५०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे

राहुल क्षीरसागरः सकाळ वृत्तसेवा

Thane News : ५०० वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर साकारले गेले आहे. या मंदिरातील श्रीराम मूती प्राणप्रतिष्ठेचा  मंगलमय सोहळा भव्य दिव्य स्वरुपात २२ जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभर उत्सव साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

याचाच एक भाग म्हणून ठाण्यातही २० जानेवारी रोजी श्रीराम मंदिर प्रतिकृती, मिरवणूक सोहळा, मासुंदा तलाव येथे महाआरती व दिपोत्सव तसेच लेझर शो च्या माध्यमातून संपूर्ण श्रीराम चरित्र उलगडले जाणार आहे. यामध्ये ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी केले.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलेले स्वप्न आणि करोडो रामभक्तांची इच्छा श्रीराम मंदिराच्या माध्यमातून प्रत्यक्ष साकार होत आहे याचा आनंद प्रत्येक हिंदू माणसाला आहे. गेल्या अनेक दिवसापासून देशाच्या विविध भागात अनेक कार्यक्रम सुरू आहेत. प्रत्येकाच्या मनामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संपूर्ण देश राममय झाला आहे. धर्मवीर आनंद दिघेसाहेब  यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात देखील श्रीराम मंदिर व्हावे यासाठी अनेकदा आंदोलने करण्यात आली तर मंदिराच्या पायाभरणीसाठी चांदीची वीट देखील ठाण्यातून पाठविण्यात आली होती, ही बाब प्रत्येक ठाणेकराच्या दृष्टीने अभिमानाची आहे. 

ठाण्यात देखील अयोध्योत होणारा सोहळा अनुभवता यावा यासाठी विविध कार्यक्रम होत आहेतच, शिवसेनेच्या  माध्यमातून शनिवार २० जानेवारी रोजी शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायं. ५ वाजता कौपिनेश्वर मंदिर ते मासुंदा तलावपर्यत श्रीराम मंदिर प्रतिकृतीची भव्य मिरवणूक तद्नंतर दिपोत्सव व मासुंदा तलाव येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रभू रामचंद्राची महाआरती काशी विश्वेश्वर येथील महंतांच्या सहयोगाने संपन्न होणार आहे.

तसेच ठाण्याच्या विविध भागामध्ये सुशोभिकरण व विद्युत रोषणाई देखील भव्य स्वरुपात करण्यात येणार असून मासुंदा तलाव येथे लेझर शो च्या माध्यमातून श्रीराम चरित्र उलगडण्यात येणार आहे.

मासुंदा तलावावर तरंगत्या रंगमंच व लेझर शो

मासुंदा तलावावर तरंगता रंगमंच उभारण्यात येणार असून या ठिकाणी श्रीराम गीतांचा कार्यक्रम तसेच प्रभू रामचंद्राच्या जीवनावर आधारित नृत्यनाटिका सादर केली जाणार आहे. लेझर शोच्या माध्यमातून श्रीरामांचा इतिहास उलगडला जाणार आहे. त्याचबरोबर आकर्षक व नेत्रदिपक अशी फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाणार आहे. हा एक उत्सवच साजरा होत असून यात ऐतिहासिक अविस्मरणीय क्षणाचे आपणही साक्षीदार व्हावे अशी आमची इच्छा आहे. यामध्ये ठाण्यातील सर्व भाषिक नागरिक पारंपारिक वेशभूषेत सहभागी होवून या सोहळयाची शोभा वाढविणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT