Baba Siddique murder Esakal
मुंबई

Baba Siddique Murder Case: बाबा सिद्दीकींची हत्या; सलमानशी मैत्री जीवावर बेतली? बिश्नोई गँगनं काटा काढला?

Baba Siddique-Salman Khan: बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.

Komal Jadhav (कोमल जाधव)

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकींची विजयादशमीच्या दिवशीच मुंबईतल्या वांद्रे परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. त्यांच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध असल्याचं तपासात समोर आलंय. हे कनेक्शन नेमकं काय? तेच समजून घेऊयात.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार बाबा सिद्दीकींची हत्या करण्यात आली. वांद्रे पूर्व परिसरात दसरा आणि विजयादशमीनिमित्त एका कार्यक्रमाला गेले असता तिथे तिघांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात बाबा सिद्दीकींचा मृत्यू झाला.

त्यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या तिघांपैकी दोघांना मुंबई पोलिसांनी रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. करनैल सिंह आणि धर्मराज कश्यप अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहेत. त्यातील करनैल हा हरियाणाचा तर, धर्मराज हा उत्तर प्रदेशातील असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या चार पथकांनी तिसऱ्या आरोपीचा शोध घेण्यासाठी राज्याबाहेर मोहीम राबवली आहे. या हत्येत चौथा आरोपी असल्याचाही पोलिसांना संशय आहे.

आता बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात? असं म्हणण्यामागचं कारण काय?

तर, ही तीच लॉरेन्स बिश्नोई गँग आहे, जिच्या रडारवर बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. तरी, बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांच्यात जवळचे संबंध होते. त्यांची मैत्रीसुद्धा बॉलिवूडमध्येही सर्वांना माहिती आहे. त्यातच मागील काही दिवसांपासून सलमान खानही लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. एकदा मध्यरात्री सलमानच्या घराखाली दुचाकीवरुन जाणाऱ्यांनी गोळीबार केला तर, दुसऱ्यांदा सलमानचे वडील सलीम खान यांना मॉर्निंग वॉकला गेले असताना एकानं थेट सलमानला मारण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे सलमान हा आधीपासूनच लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर होता आणि आताही आहे. त्याचं लॉरेन्स बिश्नोई गँगनं सलमानशी जवळीक म्हणून बाबा सिद्दीकींचा काटा काढल्याची चर्चा आहे. तरी, अटक केलेल्या आरोपीतील करनैल सिंह हा हरियाणाचा असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगशी संपर्कात असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. एका हत्येप्रकरणी तुरुंगात असताना करनैल सिंह लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात आला अन् तिथून पुढे सगळं घडलं.

कारण क्रमांक २- हरियाणातील जास्त वास्तव्य असणाऱ्या भागातील एसआरए प्रकल्पाला सिद्दीकींचा विरोध

मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील संत ज्ञानेश्वरनगर एस आर ए प्रकल्पाला बाबा सिद्दीकी आणि त्यांचे चिरंजीव आणि विद्यमान आमदार झिशान सिद्दीकींचा विरोध होता. तरी, या संत ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टीत मोठ्या प्रमाणात हरियाणा येथील एका विशिष्ट समाजाच्या लोकांचं वास्तव्य आहे. त्यामुळे एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाला विरोध केल्याच्या रागातूनच गोळीबार केला, अशी चर्चा आता वांद्रे पूर्व परिसरात रंगली आहे.

बाबा सिद्दीकींच्या हत्येचं प्लॅनिंग आधीच झालेलं?

बाबा सिद्दीकींच्या हत्येसाठी आरोपींना ॲडव्हान्स पेमेंट करण्यात आल्याची माहिती मिळतेय. त्यामुळे हा पूर्वनियोजित कट असल्याचंही पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. आता असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे २ सप्टेंबरपासून बाबा सिद्दीकींवर गोळीबार करणारे तिघे आणि आणखी एक चौथा हे चारही आरोपी वांद्र्यात एक खोली भाड्यानं घेऊन राहत होते. त्यासाठी ते महिन्याला १४ हजाराचं भाडं देत होते. त्यानंतर त्यांनी मागील २०-२५ दिवसांपासून बाबा सिद्दीकींवर पाळत ठेवण्यासही सुरुवात केली होती. त्यांच्या घराची रेकी करून ठेवली होती. त्यानंतर विजयादशमीच्या दिवशी आरोपींनी बाबा सिद्दीकींचा काटा काढला. दोघांना बेड्या ठोकल्यानंतर आता इतर दोन आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तब्बल 18 वर्षांनंतर ठाकरे बंधू दिसणार एकाच मंचावर; शिवसेना-मनसेची आज संयुक्त विजयी रॅली, मराठीसाठी 'या' नेत्यांची धडाडणार तोफ

मोठी बातमी! आषाढी सोहळ्याच्या रात्री उघडणार उजनी धरणाचे १६ दरवाजे; सध्या धरणात १७ हजार क्युसेकची आवक, धरणाची पाणीपातळी ७७ टक्क्यांवर

PM Narendra Modi: भारतासाठी आकाशही ठेंगणे; पंतप्रधान मोदी यांचे गौरवोद्‌गार

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

Ashadi Wari 2025: पंढरीची वारी पोचली लंडनच्या दारी!विठ्ठल-रुक्मिणीच्या पादुकांसह २२ देशांतून ७० दिवसांचा प्रवास

SCROLL FOR NEXT