eknath shinde  sakal
मुंबई

Baba Siddique Murder Case: ''एकालाही सोडणार नाही... इतर राज्यातून येऊन मुंबईत दादागिरी केलेली खपवून घेणार नाही'' बाबा सिद्दीकी प्रकरणात मुख्यमंत्री भडकले

Cabinet Meeting: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगून आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलं आहे.

संतोष कानडे

CM Eknath Shinde: राष्ट्रवादी काँगेसचे मुंबईतले ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तिसऱ्या आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी आपला संताप व्यक्त केला आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याचं सांगून आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार असल्याचं म्हटलं आहे.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सरकारला धारेवर धरले होते. त्यांना प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार असताना गृहमंत्री जेलमध्ये गेले होते, उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब लावले होते.. आमच्या सरकारच्या काळात जो कायदा हातात घेतो त्याला आम्ही सोडत नाही.

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, आमच्या सरकारमध्ये आरोपीने पोलिसावर गोळी चालवली तर म्हणतात कशी चालवली. आरोपीच्या बाजूने बोलणारे हे लोक डबल ढोलकी आहेत. बदलापूर केसमध्ये विरोधकांनी आरोपीची बाजू घेतली होती.

बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, इतर राज्यातून मुंबईमध्ये येऊन केलेली दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही. बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचवणार आहोत. त्यासाठी हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालेल. पोलिसांनी दोघांना अटक केली असून एक फरार आहे, तोही पकडला जाईल.

दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारने महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाचे नाव बदलून “रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठ” असे नामकरण केले आहे. भारतातील सर्वात प्रतिष्ठित उद्योगपती रतन टाटा यांचे वयाच्या 86 वर्षी 9 ऑक्टोबर 2024 रोजी निधन झाले. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Toll Plan: होर्मुज स्ट्रेटमध्ये नवा ट्रॅफिक सिस्टम लागू करणार! इराणचा मोठा निर्णय; संपूर्ण प्लॅनच सांगितला

PBKS vs RCB, Playing XI: बंगळुरूने पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी अचानक कर्णधार बदलला, खरं कारण काय?

वयाच्या ४६व्या वर्षीही मुक्ता बर्वे अविवाहित का आहे? 'या' व्यक्तीवर होता क्रश, म्हणाली, 'एखाद्याच्या आयुष्यात...

LPG ग्राहकांना मोठा दिलासा! २० हजार टन एलपीजी घेऊन जहाज भारतात दाखल, गॅस पुरवठ्याचं टेन्शन कमी होणार

'तुला मुलीच होतात, मुलगा नाही...'; म्हणत पतीनं पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं; पुण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT