Eknath Shinde ESakal
मुंबई

CM on Baba Siddique: सिद्दीकी हत्येचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार; एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास; मुख्यमंत्र्यांची घोषणा

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांचा मुंबईत अज्ञात तरुणांनी केलेल्या गोळीबारात मृत्यू झाला आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर मुंबईतील वांद्रे पूर्व इथं गोळीबार करण्यात आला, यात त्यांचा मृत्यू झाला आहे. सिद्दीकी यांच्या मृत्यू प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक या प्रकरणाचा तपास करणार असल्याचीही माहिती मिळतेय.

मुख्यमंत्री म्हणाले, पोलिसांना निर्देश दिलेले आहेत की मुंबईत कुठल्याही परिस्थितीत कायदा-सुव्यवस्था कोणी हातात घेता कामा नये. गँगवार डोकं वर काढता कामा नये. अशा घटना घडवून आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुंबई पोलीस यातील आरोपींना पकडतील आणि कारवाई करतील.

आरोपी हरयाणा आणि उत्तर प्रदेशचे

बाबा सिद्दीकी यांच्यावर ज्यांनी हल्ला केला त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल. यातील दोन आरोपींना पकडण्यात आलं आहे, यातील एक हरयाणा आणि उत्तर प्रदेशचा आहे. तिसऱ्या आरोपीलाही लवकरच पकडण्यात येईल.

केस फास्टट्रॅक कोर्टात चालवणार

ही केस आपण फॅस्टट्रॅकवर चालवण्याची कोर्टाला विनंती करुन अशा प्रकारच्या गुन्हेगारांना जरब बसेल अशा प्रकारची कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात आले आहेत, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नसरापूर अत्याचार प्रकरणी भीमराव कांबळेला फाशीची शिक्षा, कोर्टाचा मोठा निर्णय; ६० दिवसात निकाल अन् सुनावणी

Latest Marathi News Live Update : नसरापूर प्रकरणातील आरोपी भीमराव कांळबेला फाशी, न्यायालयाने निकालात नमूद केलेले निरीक्षणे कोणती?

Jalgaon Illegal Sand Mining : जळगावात 'सिनेस्टाईल' थरार! वाळू माफियांचा नायब तहसीलदारांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न, कार आडवी लावून डंपर पळवले

Palghar: पालघर बनणार चौथी मुंबई ! गेमचेंजर प्रकल्पांना गती येणार, कधी पूर्ण होणार? मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

सर्दी झाल्यानं बाळाला सरकारी रुग्णालयात नेलं, उपचारानंतर दृष्टी गेली; चिमुकल्याचं आयुष्य अंधारात

SCROLL FOR NEXT