Baba Siddique 
मुंबई

Baba Siddique: शाहरुखचं मत महायुतीला? शेलारांच्या मतदारसंघातले सिद्दीकी पक्षात आल्याने राष्ट्रवादीला काय फायदा?

Baba Siddique: मुंबई काँग्रेसचे प्रमुख अल्पसंख्याक चेहरा असलेले बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री पद भूषवले होते. दरम्यान बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

Sandip Kapde

Baba Siddique: महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांनी आज पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. बाबा सिद्दीकी ४८ वर्ष काँग्रेसमध्ये होते. जवळपास पाच दशके पक्षाचे सदस्य राहिल्यानंतर काँग्रेसचा राजीनामा दिल्याचे बाबा सिद्दीकी यांनी सांगितले. मुंबई काँग्रेसचे प्रमुख अल्पसंख्याक चेहरा असलेले बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असताना मंत्री पद भूषवले होते. दरम्यान बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा आहे.

बाबा सिद्दीकी वांद्रे पश्चिममध्ये १९९९-२००४, २००४-०९ आणि २००९-१४, असे तीन टर्म आमदार होते. मुंबई प्रादेशिक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि वरिष्ठ उपाध्यक्ष (२०१४). २०१९ मध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे संसदीय मंडळावर देखील त्यांनी काम केले आहे. वांद्रे पश्चिम बाबा सिद्दीकींचा गड होता. सर्वात श्रीमंत मतदार संघ म्हणून वांद्रे पश्चिम ओळखल्या जातो. उद्योगपती, अभिनेते सर्वा बाबा सिद्दीकी यांना मतदान करत होते. २००९ मध्ये बाबा सिद्दीकी यांनी भाजपचे आशिष शेलार यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१४ मध्ये मोदी लाटेत आशिष शेलार यांनी बाबा सिद्दीकी यांचा पराभव केला होता.

२००० च्या सुरुवातीच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या काळात त्यांनी अन्न व नागरी पुरवठा, कामगार, अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री अशी पदे भूषवली आहेत. २०००-२००४ या चार वर्षांच्या कालावधीसाठी त्यांची महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. सिद्दीकी हे शहरातील एक प्रमुख मुस्लिम नेते आहेत. जो शाहरुख खान आणि सलमान खान सारख्या स्टार पाहुण्यांनी हजेरी लावलेल्या स्टार-स्टड इफ्तार पार्टी साठी ओळखला जातो. दरम्यान बाबा सिद्दीकी आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. अजित पवार सध्या भाजपसोबत सत्तेत आहेत. तर वांद्रे पश्चिमध्ये भाजपचे आशिष शेलार आमदार आहेत. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाल्यानंतर त्यांना महायुतीची शक्ती मिळाली तर आशिष शेलारांची अडचण होणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.  (Latest Marathi News)

बाबा सिद्दीकी अजित पवार गटात जाण्याची गणितं काय?-

राजकीय विश्लेषक मृणालिनी नानिवडेकर यांच्याशी याबाबत आम्ही चर्चा केली. त्या म्हणाल्या, बाबा सिद्दीकी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत गेल्याने आशिष शेलार यांना फटका बसण्याची तशी शक्यता नाही. कारण आशिष शेलार भाजपचे जेष्ठ नेते झाले असून मुंबई भाजपचे अध्यक्ष आहेत. राज्याच्या राजकारणातील ते महत्वाचे नेते आहेत. बाबा सिद्दीकी सध्या अजित पवार गटात जाणं याची गणितं थोडी वेगळी असल्याची सध्या चर्चा आहे. बाबा सिद्दीकी यांना राज्यसभेत पाठवल्या जाईल कारण अजित पवार यांना अल्पसंख्यांक मतदारांमध्ये स्वत:चा प्रवेश करायचा आहे. सिद्दीकी राज्यसभेत गेले तरी आशिष शेलार यांना त्रास होण्याची शक्यता नाही. जर असे झाले नाही तरी बाबा सिद्दीकी यांच्या मतदारसंघात जिंकलेले उमेदवार आशिष शेलार हे नेते आहेत. त्यामुळे तो मतदारसंघ अजितदादा मागणार नाहीत आणि अजितदादांनी मागितला तरी तो दिला जाणार नाही.

भाजप आणि अजित पवार या दोघांमिळून शक्ती वाढवण्याचा कार्यक्रम-

भाजप आणि अजित पवार या दोघांमिळून शक्ती वाढवण्याचा हा कार्यक्रम केलेला दिसतो. कारण अल्पसंख्यांक नेते काँग्रेसला कंटाळले आहेत. काँग्रेसला भविष्य नाही आहे, असे या नेत्यांना वाटत होतं. पण त्यांना भाजपमध्ये जाण शक्य नाही. कारण राम मंदिरानंतर भाजपमध्ये अल्पसंख्यांक नेत्यांना किती स्थान असेल, याबद्दल दोन्ही बाजुने प्रश्न होता. भाजपकडे निघालेल्या काही अल्पसंख्याक नेत्यांना सध्यातरी अजितदादा पवार असा पर्याय उपलब्ध झालेला दिसतोय. बाबा सिद्दीकीच्या प्रवेश देखील त्या नजरेतून झाला.

आशिष शेलार केंद्रात दिसणार का?

लोकसभेत कोण जाणार याचा निर्णय दिल्लीतील केंद्रीय नेते घेतात. पण बाबा सिद्दीकी आणि आशिष शेलार हे एकमेकांना पर्याय नाही आहेत. आशिष शेलार बाबा सिद्दीकी यांच्यापेक्षा उंची असलेले नेते आहेत. त्यामुळे बाबा सिद्दीकीच्या अजितदादा गटात प्रवेशामुळे आशिष शेलार यांना फायदाच होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI, 2nd ODI: जम्मू-काश्मीरच्या आकिब नबीचे भारतीय संघाकडून पदार्पण, कोणाचा झाला पत्ता कट? पाहा Playing XI

OBC Development : ओबीसींच्या विकासासाठी एक रुपयांत जागा;उपसमितीच्या बैठकीत चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश

Kur Talathi assault case: पीक पाहणीच्या कारणावरून तलाठ्यावर लाथाबुक्क्यांनी हल्ला; शासकीय कामात अडथळ्याचा गुन्हा

Latest Marathi News Live Update : पूर्णेकर कुटुंबियांचा पोलीस स्टेशनबाहेर ठिय्या

Umbartha Vastu Shastra: उंबरठ्यावर हळदीचं लेपन का करतात? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या यामागचं कारण

SCROLL FOR NEXT