Baba Siddique Murder Case Esakal
मुंबई

Baba Siddique Shot Dead: तब्बल 10 वेळा झाले बाबा सिद्दीकींच्या हत्येचे प्रयत्न; पोलिसी खाक्या दाखवल्यावर आरोपींनी काय काय सांगितले?

More than 10 attempts to kill Baba Siddique: गोळीबाराच्या ठिकाणापासून सुमारे 100 मीटर अंतरावर पोलिसांना एक काळी पिशवी सापडली, जी कदाचित आरोपींनी फेकली असावी. यात एक पिस्तूल आणि काही कागदपत्रे आहेत.

आशुतोष मसगौंडे

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी मुंबईत बिश्नोई गँगने गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर काही वेळातच मुंबई पोलिसांना आरोपींना अटक केली आहे. दरम्यान या आरोपींच्या चौकशी दरम्यान त्यांनी पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाबा सिद्दीक यांची हत्या करणाऱ्या हल्लेखोरांनी गेल्या महिनाभरात वांद्रे आणि आसपासच्या परिसरात 10 हून अधिक वेळा सिद्दीकी अयशस्वी प्रयत्न केले होते, असे पोलिसांनी सांगितले.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “हल्लेखोरांना बाबा सिद्दीकी यांच्यावर खेरवाडी येथील त्यांचा मुलगा झीशानच्या कार्यालयाजवळ ठार मारण्याचे सांगण्यात आले होते कारण तो मोकळा परिसर आहे.” याबाबतचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

“हल्लेखोरांनी या दहाही वेळा सिद्दीकी यांना मारण्याचे केलेले प्रयत्न अपयशी ठरले कारण, प्रत्येकवेळी काहीतरी अडचणी आल्याने त्यांना त्याच्यावर गोळीबार करण्याची संधी मिळाली नाही,'' असेही पोलिसांनी सांगितेल.

दरम्यान, पोलिसांनी मंगळवारी या प्रकरणातील आणखी एक आरोपी हरिशकुमार निषाद (२४) याला उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथून अटक केली आहे. यापूर्वी या प्रकरणातील 4-5 आरोपींना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान या प्रकरणात, गोळीबाराच्या ठिकाणापासून सुमारे 100 मीटर अंतरावर पोलिसांना एक काळी पिशवी सापडली, जी कदाचित आरोपींनी फेकली असावी. यात एक पिस्तूल आणि काही कागदपत्रे आहेत.

या पिस्तुलाचा वापर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे. आता पोलिसांनी ही बॅग आणि पिस्तूल जप्त केले. आता अटकेत असलेल्या आरोपींकडून या प्रकरणाबाबात मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sand Mining Ban: राज्यात अवैध वाळू उपसा बंद करण्याचे आदेश; मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका निकाली

Latest Marathi News Live Update : पिकाचा पंचनामा करताना तलाठ्याला सर्पदंश

Video: अन् त्याने जोरात आईला ओढलं; तीन वर्षांच्या चिमुकल्याने पाच सेकंदात वाचवला आईचा जीव

LPG Price Hike: दिवाळीच्या आधीच महागाईचा तडाखा; एलपीजी गॅसचे दर वाढले, तुमच्या शहरात किती झाली किंमत?

Kids Health: लठ्ठ मुलांना प्रौढावस्थेत आरोग्याचा गंभीर धोका 'या' समस्या उद्‍भवण्याचा तज्ज्ञांचा इशारा

SCROLL FOR NEXT