Baba Siddiqui Murder Case ESakal
मुंबई

Baba Siddiqui Case Update: धमकी आल्यानंतर बाबा सिद्दिकींना सुरक्षा का दिली नाही? काँग्रेस नेते संतापले, पोलीस आणि सरकारवर ओढले ताशेरे

Baba Siddiqui Murder Case: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची शनिवारी रात्री गोळ्या झाडून हत्या केल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे.

Vrushal Karmarkar

Baba Siddiqui Murder Case Update: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (१२ ऑक्टोबर) रात्री उशिरा मुंबईतील वांद्रे पूर्व येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्याच्या छातीत आणि पोटात 2-3 गोळ्या लागल्याचे सांगण्यात येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या शूटर्सना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर राजकारणही तापलं आहे. सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. आता यावर कॉंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, ही खंडणीची हत्या आहे का? त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या की नाही? जर होय, तर त्यांना योग्य सुरक्षा का दिली गेली नाही? ही अत्यंत गंभीर बाब आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था कशी आहे? कायदा आणि सुव्यवस्था कोलमडली आहे, असं म्हणत त्यांनी राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर ताशेरे ओढले आहेत.

ते पुढे म्हणाले की, बाबा सिद्दिकींना कुणी मारलं? त्यांच्या हत्येमागचा सुत्रधार कोण आहे? यामागील सत्य समोर येणार का? आपली वाटचाल पुन्हा ९० च्या दशकात होत आहे का? जिथे अशा घटना वारंवार होत होत्या. मुंबई एकमात्र शहर आहे, जिथे दोन कमिशनर आहेत. एक मुख्यमंत्र्याचा लाडका कमिशनर आणि दुसरा गृहमंत्र्यांचा लाडका कमिशनर.. मात्र कुणाचं चालतं इथे. पण हे खरं आहे की महाराष्ट्र राज्याची कायदा आणि सुरक्षा व्यवस्था बिघडली आहे. कुणाला तरी याची जबाबदारी घ्यावी लागेल. मला नाही वाटत की याची जबाबदारी सरकार घेईल, असं सूचक वक्तव्य त्यांनी केले आहे.

तर यावर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले की, या घटनेने महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांना लाज वाटली पाहिजे. दोन लोक शहरात का राहतात आणि ते कुठे प्रवास करतात हे पोलिसांना कसे कळले नाही? सरकार आणि इतर राजकीय पक्षांनी पोलिसांच्या कामात ढवळाढवळ करणे थांबवले पाहिजे, असं ते म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pharmacy College Ban: राज्यात नवीन फार्मसी महाविद्यालयांना बंदी! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; कारण काय?

IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

'मी अनिल कपूरसारख्या माणसासोबत कधीच लग्न करणार नाही' असं का म्हणाली होती माधूरी?

विवाहित सतीश राजवाडेंसोबत जोडलं गेलेलं मुक्ता बर्वेचं नाव; पत्नीने दिलेली अशी प्रतिक्रिया, म्हणाली, 'मी स्वतः त्याला...'

Nursing Day Celebration: समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा

SCROLL FOR NEXT