मुंबई ः आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासाठी गुरुवारी विधान भवनासमोर आंदोलन केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. (छायाचित्र ः विजय बाटे)
मुंबई ः आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा, यासाठी गुरुवारी विधान भवनासमोर आंदोलन केले. या वेळी अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. (छायाचित्र ः विजय बाटे) 
मुंबई

ओला दुष्काळ जाहीर करा : बच्चू कडू

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात परतीच्या पावसाने पिकांच्या झालेल्या नुकसानाने शेतकरी हैराण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक गेले आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा गुरुवारी राजभवनावर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजभवनावर जाण्याआधीच मोर्चा पोलिसांनी अडवत कडू यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतले.

शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना राज्यपालांनी भेट नाकारल्याबद्दल शेतकरी नेते राजू शेट्‌टी यांनी तीव्र संताप व्यक्‍त केला. राज्यपालांना शेतकऱ्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. राज्यात सरकार नसताना दाद कोणाकडे मागायची? प्रशासकीय अधिकार राज्यपालांकडे असून शेतकऱ्यांच्या समस्या ऐकत नसतील तर त्यांनी सूत्रे कशाला घ्यायची, असा सवाल त्यांनी केला.

बच्चू कडू यांच्यावर गुन्हा दाखल
आमदार बच्चू कडू व त्यांच्या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मित्तल टॉवरजवळ केलेल्या निदर्शनांच्या पार्श्‍वभूमीवर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी त्यांच्यावर भादंवि कलम ३४१, १४३, १४४, १४७, १४९, १८८ व मुंबई पोलिस कायदा कलम ३७(१), १३७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बच्चू कडू यांच्यासह पाच कार्यकर्त्यांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना याप्रकरणी अटक करून जामिनावर त्यांची सुटका करण्यात आल्याची माहिती उपायुक्त संग्रामसिंग निशानदार यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : संजय पाटील विरुद्ध विशाल पाटील यांच्यात 'टशन'; माजी मंत्र्यांच्या भूमिकेमुळे निवडणूक बनली लक्षवेधी

Sunidhi Chauhan: भर कॉन्सर्टमध्ये प्रेक्षकानं बॉटल फेकून मारली; पण ती डगमगली नाही, सुनिधी चौहाननं दिलं सडेतोड उत्तर

Elon Musk Scam : इलॉन मस्कने म्हटलं 'आय लव्ह यू', अन् तरुणीवर झाला कर्जाचा डोंगर.. काय आहे प्रकरण?

'आम्ही सुद्धा थोडं क्रिकेट खेळलोय...' भारताच्या सर्वश्रेष्ठ फलंदाजाने विराटवर ओढले ताशेरे, चॅनलला देखील दिला इशारा

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

SCROLL FOR NEXT