मुंबई

बचत गटांच्या महिलांची अमेरिका सवारी 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : ग्रामीण बचत गटांच्या महिलांद्वारे उत्पादित वस्तूंचे आता थेट अमेरिकेत प्रदर्शन होणार आहे. यात वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, खाद्यसंस्कृती, हातमाग आदींचा समावेश असेल. यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण बचत गटांच्या महिलांचा समूह अमेरिकेला भेट देणार आहे. या महिला तेथील एमआयटी, स्टॅंडफोर्ट विद्यापीठ, टीआयई चार्टर, फेसबुकसारख्या विविध नामवंत संस्थांना भेटी देऊन जागतिक स्तरावरील उद्योजकतेची माहिती घेणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (फिक्की) यांच्यामार्फत या दौऱ्याचे आयोजन केले आहे. या दौऱ्यात मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह ग्रामविकास सचिव असीम गुप्ता, उमेद अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर. विमला, फिक्कीचे अतिरिक्त संचालक रुबाब सूद, बचत गट प्रतिनिधी विमल जाधव, राजश्री राडे, अनिता सोनवणे, संगीता गायकवाड यांचा समावेश आहे. 

हा समूह अमेरिकेतील बोस्टन, न्यूयॉर्क, सॅनफ्रान्सिस्को या शहरातील एमआयटी, स्टॅंडफोर्ट विद्यापीठ, फेसबुक आदी संस्थांना हा समूह भेटी देणार आहे. तेथील लघुउद्योग क्षेत्रातील यशस्वी आणि प्रभावी व्यक्ती, संशोधक, गुंतवणूकदार, उद्योग क्षेत्रातील धोरणकर्ते, टीआयई चार्टरचे सदस्य यांच्या भेटी घेऊन लघुउद्योग आणि गुंतवणूक याबाबतीत चर्चा केली जाणार आहे. महाराष्ट्रातील वारली उत्पादने, हस्तकला उत्पादने, महाराष्ट्राची वैशिष्ट्ये असलेली वस्त्र उत्पादने, इथली खाद्यसंस्कृती, हातमाग उत्पादने आदींविषयक अमेरिकेतील नागरिकांना विशेष आकर्षण असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT