nawab malik, Sameer Wankhede esakal
मुंबई

खोटी कागदपत्रे तपासण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला नाही - नवाब मलिक

वैधानिक पदावर बसलेली व्यक्ती हे वागू शकते का? याबाबत आम्ही राष्ट्रपतींना तक्रार करणार आहोत.

सकाळ वृत्तसेवा

- सुशांत सावंत

मुंबई: अनुसूचित जाति आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार (Arun haldar) यांनी काल समीर वानखेडे (Sameer wankhede) यांना क्लीन चीट दिली. त्याच मुद्दावरुन आज नवाब मलिक (Nawab malik) यांनी अरुण हलदार यांच्यावर जोरदार टीका केली व अरुण हलदर यांचे वागणे संशयास्पद असल्याचं वक्तव्य केलं. समीर वानखेडे यांनी घोटाळे करुन सर्टिफिकेट, (Forge certificate) नोकरी मिळवली, असा नवाब मलिक यांचा आरोप आहे. त्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी अरुण हलदार यांच्यावर टीका केली.

"अनुसूचित जाति आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलदार यांनी काल समीर वानखेडे यांनी कोणतही धर्म परिवर्तन केलं नाही" असं म्हटलं. "हलदर हे समीर वानखेडे यांच्या घरी जातात आणि क्लीन चिट देतात. त्यानंतर राज्यमंत्री रामदास आठवले हे स्वतः पत्रकार परिषद घेतात. ज्याने घोटाळे करून सर्टिफिकेट घेतले त्याचे समर्थन हे मंत्री करतात हे दुर्देव आहे" असे नवाब मलिक म्हणाले.

"खोटी कागदपत्रे तपासण्याचा अधिकार मागासवर्गीय आयोगाला नाही. खोट्या कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी एक कमिटी असते मागासवर्गीय आयोगाला हे अधिकार नाहीत असे नवाब मलिक म्हणाले. अरुण हलदर यांचे हे वागणे संशयास्पद आहे. वैधानिक पदावर बसलेली व्यक्ती हे वागू शकते का? याबाबत आम्ही राष्ट्रपतींना तक्रार करणार आहोत. केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे देखील तक्रार करणार आहोत" असे नवाब मलिक म्हणाले.

क्रांती रेडकरबद्दल मलिक म्हणाले...

मी समीर वानखेडे यांच्या दुसऱ्या पत्नीचे कधीच नाव घेतले नाही. मी त्यांच्या दोन्ही मुलींबाबत देखील कधी बोललो नाही. समीर वानखेडे यांच्या खोट्या कागदपत्राची तक्रार आम्ही कमिटीसमोर करणार आहोत, असे नवाब मलिक म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : कोकणात अडकलेला मान्सून पुढे सरकणार, पण मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात कधी पोहोचणार? हवामान विभागाकडून अपडेट जारी

Plastic Waste Drive: उरुळी कांचनमध्ये ‘माझे प्लास्टिक – माझी जबाबदारी’ संकल्पनेतून प्लास्टिक बँक; १ किलो प्लास्टिकच्या बदल्यात महिलांना साखर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

IND vs AFG, ODI: रोहित शर्मा रनआऊट झाल्यानंतर नक्की काय म्हणाला? शुभमन गिलनेच केला खुलासा

Illegal Pistol Seized: इंदापूरमध्ये अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटक; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT