Water Supply  sakal
मुंबई

Navi Mumbai: खारघरमध्ये दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठा, रोगराईचा धोका

स्थानिकांच्या आरोग्यावर संकट; दुर्गंधीत पाण्यामुळे रोगराईचा धोका

सकाळ वृत्तसेवा

Kharghar: खारघर सेक्टर अकरा परिसरात काही सोसायटीच्या दुर्गंधी युक्त पाणी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पोटदुखी, उलटी आदी आजाराची लागण झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

खारघर सेक्टर अकरा मधील साई शास्त्र, भैरवनाथ, जीवन सागर आणि इतरही काही सोसायटीत शनिवार ता.11 रात्री पासून दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत आहे. जल वाहिनीच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाण्याला वास येत असावे असे समजून त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे काही सोसायटी मधील रहिवासीयांच्या पोट दुःखी, उलटी आदी आजारात वाढ होवू लागल्यामुळे नागरिकांना बिसलेरीचे पाणी विकत घेवून प्यावे लागत आहे.काही नागरिकांकडे विचारणा केली असता, पाण्याला दुर्गंधी येत आहे.

लहान मुलांमध्ये उलटी, जुलाब आजार बळावण्याची भीती आहे. सिडकोने वेळीच लक्ष न दिल्यास प्रत्येक घरातील सदस्यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागेल असे सांगितले. या विषयी सिडकोच्या पाणी पुरवठा विभागात विचारणा केली असता, माजी नगरसेविका लीना गरड यांच्या कडून नुकताच तक्रार प्राप्त झाली असून पाहणी पाणी तपासणीसाठी लॅब मध्ये पाठविण्यात येईल असे सांगितले

तीन दिवसापासून होणाऱ्या दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा मुळे जवळपास तीन चार सोसायटी मधील मुले, महिला आणि नागरिकांना उलटी, पोटदुखी सारख्या आजाराची वाढ झाली आहे.सिडकोने वेळीच उपाय योजना करावी.- ऍड. मंगेश मालुसरे, पदाधिकारी साई शास्त्री सोसायटी से 11 खारघर

वर्ष भरापूर्वी परिसरातील सोसायटीतील सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे जलवाहिणीतून मलमिश्रित पाणी पुरवठा झाला होता. यावेळी यावेळी दुर्गंधी युक्त पाणी प्यावे लागत होते. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटी, जुलाबचे आजाराची लागण झाली होती

सिडको आणि पालिका अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून दुर्गंधी युक्त पाणी पुरवठा होत असल्याचा शोध घ्यावे, तसेच पाणी तात्काळ लॅब मध्ये तपासणीसाठी पाठवावे. तो पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा.- प्रवीण पाटील, माजी नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT