मुंबई

खराब हवेने मुंबईकरांच्या नववर्षाची सुरुवात; पहिल्याच दिवशी 307 एक्‍यूआय हवेची नोंद

भाग्यश्री भुवड

मुंबई  : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईची हवेची गुणवत्ता 307 एक्‍यूआय नोंदविली गेली आहे. हा हवेचा सर्वात वाईट दर्जा आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस मुंबईची हवेची गुणवत्ता अशीच राहणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

मुंबईत गेल्या 4 दिवसांपासून थंडी पडत आहे. त्याचा परिणाम आता मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवरदेखील होत आहे. वायु गुणवत्ता व हवामान अंदाज आणि संशोधन (सफर) च्या हवामानानुसार, शुक्रवारी मुंबईची एअर क्वालिटी 307 एक्‍यूआय नोंदली गेली, जी "अतिशय वाईट' प्रकारात येते. विशेष म्हणजे गुरुवारीदेखील हवेची गुणवत्ता 307 एक्‍यूआय नोंदवली गेली होती. 
सफरचे संचालक गुफरान बेग यांनी सांगितले की, थंडीमुळे हवेतील कण वातावरणात साचून राहत आहेत. त्यामुळे हवेतील प्रदूषक बाहेर पडत नाहीत. हवेच्या गुणवत्तेचा विचार केल्यास 31 डिसेंबर ची हवा हि 2020मधील सर्वात वाईट हवा म्हणून नोंदवली गेली आहे. अन्यथा संपूर्ण वर्षभर हवेची गुणवत्ता चांगली होती, असे सफरतर्फे सांगण्यात आले आहे. 

या भागात सर्वाधिक प्रदूषण - 
मुंबईत बीकेसीमध्ये 385, माझगावमध्ये 347, मालाडमध्ये 355, चेंबूरमध्ये 316 आणि अंधेरीमध्ये 293 ऐक्‍यूआय नोंदवली गेली आहे. 

हवेचा दजा 
0 ते 50 एक्‍यूआय - चांगली 
51 ते 100 एक्‍यूआय - ठीक 
101 ते 200 एक्‍यूआय - मध्यम 
201 ते 300 एक्‍यूआय - खराब 
301 ते 400 एक्‍यूआय - अत्यंत वाईट 
400च्या वर - गंभीर 

ढगांनी वेढलेली मुंबई, पण पाऊस नाही 
शुक्रवारी मुंबईत ढगाळ वातावरण होते. हवामान निरीक्षक स्कायमेटचे मुख्य मेट्रोलॉजिस्ट महेश पालावत यांनी सांगितले की, मुंबई ते गुजरातपर्यंत ढगाळ वातावरण कायम आहे. परंतु पावसाची शक्‍यता नाही. हे ढग साफ होण्यास एक ते दोन दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतर तापमानात वाढ होईल. 

Bad weather starts Mumbaikars New Year 307 AQUI air record on the first day

---------------------------------------------- 

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT