Badlapur Assault Case Esakal
मुंबई

Badlapur: बर्थ डे पार्टीत तरुणीला मैत्रिणीनं पाजलं गुंगीचं औषध अन् नराधम मित्रांनी... बदलापुरात अत्याचाराची आणखी एक भयंकर घटना

Badlapur Assault Case: गेल्या काही दिवसांपासून अत्याचारांच्या घटनांसाठी चर्चेत असलेल्या बदलापुरातून अत्याचाराची आणखी एक घटना समोर आली आहे.

आशुतोष मसगौंडे

गेल्या काही दिवसांपासून अत्याचारांच्या घटनांसाठी चर्चेत असलेल्या बदलापुरातून आणखी एक घटना समोर आली आहे. येथे वाढदिवसाच्या पार्टीत एका तरुणीवर दोन मित्रांनी अत्याचार केले असून यासाठी पीडिती तरुणीच्या मैत्रिणीनेच मदत केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पीडित तरुणीला वाढदिवसाच्या पार्टीला घेऊन जात तिच्या मैत्रिणिने औषध पाजले आणि नंतर दोन मित्रांनी अत्याचार केला.

ही घटना बदलापूरच्या शिरगाव परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी आणि गुरुवारी मध्यरात्री घडली, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी संतोष शिवराम रुपावते (४०), शिवम संजय राजे (२३), अलिस्का उर्फ ​​भूमिका रवींद्र मेश्राम (२०) यांना अटक केली आहे, असे त्यांनी सांगितले.

भूमिकाने पीडितेला तिच्या मित्राच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीला बोलावले होते. त्यानंतर पीडिता भूमिकासोबत शिरगाव येथील फ्लॅटवर पार्टीसाठी गेली. फ्लॅटमध्ये भूमिकाचा सातारा येथील नातेवाईक संतोषही त्यांच्यासोबत आला होता. त्यांनी कथितरित्या पीडितेच्या पेयात गुंगीचे औषध घातले. त्यानंतर दोन पुरुष आरोपींपैकी एकाने तिच्यावर बलात्कार केला, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीन संशयितांना तत्काळ अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलामांनुसार गुन्हे दाखल केले आहेत. शिवाय, या गुन्ह्याबाबत पोलीस अधिक माहिती गोळा करत असल्याने या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''कानाखाली द्या पण व्हिडीओ काढू नका'' केडिया प्रकरणावर राज ठाकरेंनी मनसैनिकांना कोणता संदेश दिला?

Latest Maharashtra News Updates : हिंदू हिंदुस्थान मान्य पण हिंदीची सक्ती मान्य नाही - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंची युतीची घोषणा, म्हणाले, "दोघे भाऊ सत्ताधाऱ्यांना फेकून देणार"

Raj Thackeray: जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी करून दाखवलं, राज ठाकरेंनी सांगितलं एकत्र येण्याचं कारण

Video Viral: कसोटी सामन्यात मैदानात आलेल्या कुत्र्याला ड्रोनने घाबरवलं; AUS vs WI लाईव्ह सामना थांबला

SCROLL FOR NEXT