Badlapur News Esakal
मुंबई

Badlapur News: बदलापूर खरवई MIDC कंपनीत भीषण स्फोट; काही जण जखमी; घटनेचा VIDEO आला समोर

Badlapur Kharwai MIDC Fire: बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत भीषण स्फोट झाला. यामध्ये ४ ते ५ कामगार जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटामध्ये ४ ते ५ कामगार जखमी झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, बदलापूर खरवई एमआयडीसीमध्ये गुरुवारी पहाटे ही घटना घडली. या एमआयडीसीतील व्ही.के केमिकल या कंपनीला पहाटे चार वाजून 45 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमुळे कंपनीत चार ते पाच स्फोट झाले. या स्फोटाचे हादरे 4 ते 5 किलोमीटर पर्यंत जाणवले आहेत. या घटनेत चार ते पाच कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी बाहेर दोन टेम्पो उभे होते. या टेम्पोमधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली. या आगीबाबत माहिती मिळताच बदलापूर, अंबरनाथ आनंद नगर एम आय डी सी मधील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं असून आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाचा निर्णय! महायुती सरकारचे तब्बल ₹१२,२४० कोटी रुपये वाचणार; योजनेत मोठा टर्निंग पॉइंट

भाई, हा तर हार्दिक पांड्याची पोल खोलतोय! R Ashwin नं नाव न घेता Mumbai Indians च्या कर्णधाराला धुतले, Video Viral

Pune Kolwan ashram suicide: कोळवणच्या चिन्मय विभूती आश्रमात २५ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात खळबळ

Rajgad Drowning Case: गुंजवणी धरणात बुडालेला दुसरा मृतदेह सापडला;दोन सख्ख्या भावांचा बुडून मृत्यू,राजगड तालुक्यातील हृदयद्रावक घटना!

Pune Canal Body Found: जारकरवाडीतील डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातील मृतदेहाची टी-शर्टवरील नावाच्या धाग्याने उकल

SCROLL FOR NEXT