Police investigation underway after a shocking child abuse incident in a school bus in Badlapur, triggering public outrage and concerns over student safety.
esakal
Shocking Child Abuse Incident in Badlapur : बदलापूर शहरात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार केल्याची अतिशय संतापजनक घटना घडली आहे. शाळेच्या मिनी बस चालकाने अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार केल्याचे उघडकीस आली आहे.
या घटनेने एकच खळबळ उडाली आणि लोकांमधून संताप व्यक्त होत आहे. तर या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर याआधीही बदलापुरात काही महिन्यांपूर्वी एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती.
या घटनेनंतर बदलापूरवासियांनी प्रचंड आक्रमक होत अक्षरशा रेल रोको आंदोलन केलं होतं. यानंतर पोलिसांनी त्या आरोपीला अटक करून त्याचे एन्काउंटर केले होते. शिवाय, या संपूर्ण घटनेवरून राज्यातील राजकारणही बरंच तापलं होतं.
प्राप्त माहितीनुसार, शाळेच्या मिनी बसमध्येच चालकाने चिमुकलीवर अत्याचार केला. यानंतर या घटनेची माहिती चिमुकलीने घरी पालकांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास देखील सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.