मुंबई

Badlapur School Crime: मोठी बातमी; आरोपी अक्षय शिंदेची चिमुकल्यांसमोर होणार ओळख परेड!

Latest Marathi News: न्यायालयाने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे.

Chinmay Jagtap

बदलापूरमध्ये एका शाळेत अतीशय किळसवाणा प्रकार घडला होता. यावेळी एका सफाई कर्मचाऱ्याने शाळेतील २ चिमुकल्यांवर अत्याचार केला होता. अक्षय शिंदे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या विषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे, अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे.

बदलापूर चिमुरड्यांवरील अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याची पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे. पुढील एक-दोन दिवसांत ही ओळख परेड होण्याची शक्यता आहे. यासाठी ‘एसआयटी’ने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने आरोपीची ओळख परेड करण्यासाठी परवानगी दिली आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. त्याच्याविरोधाच शाळेतील दोन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप आहे. एका प्रकरणात न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यानंतर ‘एसआयटी’ने पीडित मुलींपैकी दुसऱ्या मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून दुसरा गुन्हा दाखल करत त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले होते.

या वेळी आरोपीची ओळख परेड करण्यासाठी एसआयटीने न्यायालयामध्ये अर्ज केला होता. त्यानुसार न्यायालयाने ही परवानगी दिली आहे. या गुन्ह्याच्या तपासात कोणतीही त्रुटी राहू नये, म्हणून ही ओळख परेड करण्यात येणार आहे. येत्या एक ते दोन दिवसांत तुरुगांमध्ये आरोपीची पीडित मुलीसमोर ओळख परेड करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT