Cyber Crime News Sakal
मुंबई

Badlapur Crime: मी डेंग डॅनियल बोलतोय! बदलापूरच्या तरुणाला पुण्यात बसून गंडवले, नायजेरियन भामटा असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

गुन्ह्याची नोंद होताच बदलापूर पश्चिम पोलिसांच्या सहकार्याने उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाने, एका नायजेरियन आरोपीला या गुन्ह्याखाली पुण्यामधून अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी जाधव

बदलापूर : उल्हासनगर क्राईम ब्रांचने नायजेरियन आरोपीला ठोकल्या बेड्या बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात राहणाऱ्या सुरेश गौडा नामक व्यक्तीची पुणे येथून संपर्क करुन अलेक्झांडर नावाच्या आरोपीने मोठ्या शिताफीने, कस्टम ड्युटी च्या नावाने जवळपास ३ लाख रुपयांची फसवणूक केली.

यावेळी, गुन्ह्याची नोंद होताच बदलापूर पश्चिम पोलिसांच्या सहकार्याने उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या पथकाने, एका नायजेरियन आरोपीला या गुन्ह्याखाली पुण्यामधून अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून 80 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

बदलापूर पश्चिम बेलवली परिसरात राहणारे, सुरेश नारायण गौडा यांना ३० ऑक्टोंबर २०२३ रोजी सकाळी ११:१० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर ८०९७८९६०८७ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. यावेळी समोरील व्यक्तीने गौडा याना इंग्लीशमध्ये सांगितले की मी डेंग डॅनियल बोलतोय. तुम्ही व्यवसायीक कर्जाकरीता बॅकेत चौकशी करत होते.

त्यामुळे मी तुम्हाला फोन केला आहे. मी स्वतः देखील व्यावसायिक कर्ज देतो, परंतू तुम्हाला त्याकरिता कस्टम ड्युटीसाठी रक्कम भरावी लागेल. असे सांगुन त्यानंतर इन्कम टॅक्स करीता सुद्धा रक्कम भरावी लागेल असे सांगुन, गौडा यांची एकुण ३,०३,६९९/- रूपयांची ऑनलाईन फसवणुक केली. ही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच गौडा यांनी याबाबतची तक्रार बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

यादरम्यान बदलापूर पश्चिम पोलीस व या गुन्ह्याचा समांतर तपास उल्हासनगर गुन्हे शाखेकडे देखील देण्यात आला होता. यावेळी पोलीस हवालदार चंद्रकांत पाटील आणि सतीश सपकाळे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी अलेक्झांडरची माहिती काढली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुणे येथील उंडरी वडाची वाडी येथे लपून बसलेल्या अलेक्झांडर याला ताब्यात घेतले.

अटक करण्यात आले त्यावेळी अलेक्झांडर याच्याकडून लॅपटॉप, दोन मोबाईल, तीन एटीएम कार्ड हस्तगत करण्यात आले असून, या गुन्हेगाराला बदलापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले. यावेळी पोलीस अलेक्झांडर कडून हे पैसे तांत्रिक पद्घतीने कुठे कुठे गुंतवले असल्याची माहिती घेऊन पुढील तपास करत असल्याचे बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अनिल थोरवे यांनी सांगितले.

सध्याची पिढी ही सुशिक्षित आहे तर, ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार सुद्धा सुशिक्षित व तांत्रिक बाबीत सराईत आहेत. मात्र आपल्या शिक्षणाचा योग्य वापर झाला पाहिजे या अनुषंगाने कोणत्याही अज्ञात व्यक्ती, अज्ञात व्यक्तीचा कॉल उचलून आपण आपली गोपनीय माहिती देऊ नये.

तसेच ऑनलाईन फसवणूक झाली तर, लगेचच १९३० या क्रमांकावर संपर्क करुन, अथवा सायबर क्राईम साठी सरकारी संकेत स्थळावर तसेच जवळील पोलीस स्टेशन मध्ये जाऊन गुन्ह्याची नोंद करावी. आम्ही या माध्यमातून जनजागृती करत आहोतच मात्र नागरिकांनी देखील जास्त सतर्क राहावे.

- अनिल थोरवे पोलिस निरीक्षक बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT