bag with jewelry worth three lakhs returned to passenger Churchgate Railway Police mumbai sakal
मुंबई

Mumbai : साडेतीन लाख किमतीचे दागिने असलेली बॅग प्रवाशाला परत!

मरीन लाईन रेल्वे स्थानकात उतरलेल्या मीरारोड येथील एका तरुणाची एसी लोकलमध्ये गडबडीत राहून गेली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मरीन लाईन रेल्वे स्थानकात उतरलेल्या मीरारोड येथील एका तरुणाची एसी लोकलमध्ये गडबडीत राहून गेलेली साडेतीन लाख रुपये किमतीचे दागिने असलेली बॅग, चर्चगेट लोहमार्ग पोलिसांनी ती बॅग शोधुन प्रवाशाच्या हवाली केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ मे रोजी सायंकाळी ६.११ वाजता चर्चगेट अप एसी लोकलमध्ये विरार बाजू कडून तिसऱ्या डब्यामध्ये एक पांढऱ्या रंगाची बॅग त्यामध्ये साडेतीन लाख रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली बॅग प्रवासी नावे मुकेश बाबाजी बाहेर हे बॅग न घेता मरीन लाईन रेल्वे स्टेशन येथे उतरले अशी माहिती वाडी बंदर येथून १५१२या रेल्वे पोलीस हेल्पलाइनवर चर्चगेट लोहमार्ग पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर सदरची एसी लोकलची तपासणी केल्यानंतर बॅग मिळून आली. आल्यानंतर सपोको सकुंडे व बिरजे यांनी चर्चगेट रेल्वे पोलीस ठाणेत प्रवासी मुकेश बाबाजी बाहेर याना समक्ष बोलवून सदरची बॅग व आतील सोने हे त्यांचेच असल्याचे खात्री करून ठाणे अंमलदार शिवतरे यांच्या समक्ष त्यांचे ताब्यात दिले त्याबद्दल फिर्यादी यांनी तसेच चर्चगेट रेल्वे पोलीस ठाण्यातील अधिकारी अमलदार यांचे खूप खूप आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Involvement in Red Fort Blast : अखेर पाकिस्तानचा खोटेपणाचा बुरखा फाटलाच! दिल्ली स्फोटातील सहभागाची नेत्यानेच दिली कबूली

Petrol Pump : पेट्रोल पंप संध्याकाळी सातनंतर बंद करण्याचा निर्णय मागे; पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनचा निर्णय

Mundhwa Land Case : मुंढवा जमीन प्रकरणात शीतल तेजवानींचा जबाब नोंदविला

Pravin Darekar : सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती; सहकाराला आधुनिकतेची जोड द्यावी

Property Tax : समाविष्ट गावाच्या मिळकतकराचा प्रश्‍न जैसे थे; पूर्वीच्याच आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT