Aryan Khan Sakal
मुंबई

लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर आर्यनला जामीन, 'या' आहेत अटी

उच्च न्यायालयाची पाच पानांची आदेशाची प्रत

स्वाती वेमूल

Aryan Khan Drugs Case: क्रुझवरील ड्रग्ज पार्टीप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनाच्या आदेशाची प्रत मुंबई उच्च न्यायालयाने जारी केली आली. पाच पानांची ही आदेशाची प्रत आहे. आर्यनसह त्याचा मित्र आणि प्रकरणातील सहआरोपी अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांचा एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

जामिनाच्या आदेशातील अटी-

- असा गुन्हा पुन्हा करू नये

- इतर आरोपींशी संपर्क साधू नये

- साक्षीदारांवर दबाव आणू नये

- देश सोडून जाऊ नये

- माध्यमांशी या प्रकरणाविषयी संवाद साधू नये

- दर शुक्रवारी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत एनसीबी कार्यालयात हजेरी लावावी.

- विशेष न्यायालयात पासपोर्ट जमा करावा.

- सुनावणीला वेळेत हजर राहावं.

- पुराव्यांशी छेडछाड करू नये

- आरोपींना तपास अधिकाऱ्यांना न सांगता मुंबईबाहेर जाता येणार नाही

उच्च न्यायालयाने गुरुवारी हा जामीन मंजूर केला होता. मात्र, जामिनाच्या अटींबाबतचा आदेश शुक्रवारी देण्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. २५ दिवसांहून अधिक काळ कारागृहात असलेल्या आर्यनची आज (शुक्रवार) किंवा शनिवारी सुटका होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ambarnath Case : विवाहानंतर अवघ्या ६० दिवसांत काय घडलं? अंबरनाथमध्ये २८ वर्षीय विशाखाने बेडरूममध्ये घेतला गळफास; हुंड्यासाठी सासरच्या छळाला कंटाळून उचललं पाऊल

Karad Politics: कराडमध्ये नगरसेवकांचे शक्तिप्रदर्शन; आमदार अतुल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित मतदान

तारिणी मालिकेतून 'या' अभिनेत्रीची एक्झिट, सोशल मीडियावर शेअर केली भावुक पोस्ट, म्हणाली...

Smartphone Ban : 'या' देशात सरकारी कर्मचाऱ्यांच्या स्मार्टफोन वापरावर बंदी, आदेश झुगारल्यास नोकरीला मुकावे लागणार, तुरुंगवासही होणार

Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

SCROLL FOR NEXT