Balasaheb Thackeray sakal
मुंबई

Dasara Melava 1970 : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बॉलीवूडची एन्ट्री,आठवणी बाळासाहेबांच्या; दस्तावेज 'सकाळ'चे

सकाळ डिजिटल टीम

Balasaheb Thackeray: परळ निवडणूक आम्ही जिंकून विधानसभेत प्रवेश करणारच, असा विश्वास शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी १९७०च्या शिवाजी पार्कवरील सभेत व्यक्त केला. आय. एस. जोहर, वैजयंतीमाला व निरुपा रॉय हे प्रमुख सिनेमा नट-नटी सभेस उपस्थित होते. स्वतंत्र पक्षाचे नाना चुडासमाही व्यासपीठावर दिसत होते.

वैजयंतीमाला यांनी 'शिवसेना झिंदाबाद ' एवढेच दोन शब्दांचे भाषण केले. याशिवाय दत्ताजी साळवी, प्रमोद नवलकर, सुधीर जोशी यांची भाषणे झाली.

ठाकरे यांनी आपल्या भाषणात कम्युनिस्ट नेते डांगे व प्रजासमाजवादी पक्षावर टीका केली. डांग्यांबद्दल ते म्हणाले, जगाच्या एकतृतीयांश भागात आमचे राज्य आहे असे डांगे नेहमी सांगत असतात पण मुंबईतील दळवी बिल्डिंगवर तरी तुमचे राज्य आहे काय, असा प्रश्न मला त्यांना विचारावयाचा आहे."

शिवसेनेस विधानसभेत निवडून द्यायचे होते म्हणून त्यांच्या कार्यकर्त्यांनी कृष्णा देसाईंचा खून केला, असा आरोप प्रजासमाजवादी कार्यकर्ते करतात. त्यास उत्तर देताना ठाकरे म्हणाले, " प्रजा- समाजवादी कार्यकर्ते राम महाडीक यांचे १९७२ चे निवडणुकीवर लक्ष आहे.

या निवडणुकीत शिवसेनेचे सदाकांत ढवण त्यांच्याविरुद्ध उभे राहणार होते, म्हणून त्यांचा खून प्रजासमाजवाद्यांनी केला का ? असा आरोप आम्ही केला तर काय होईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja 2026 First Look: मुंबईच्या राजाचं पहिलं दर्शन आज! लालबागच्या राजाचा LIVE सोहळा कुठे पाहाल?

Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

PF खात्यातून इमर्जन्सीत पैसे काढायचे आहेत? EPFO ने बदलले नियम, आता मिळतील 'इतके' टक्के पैसे!

Latest Marathi News Live Update : ३५ दिवसांचा दुष्काळी खंड संपला; यवतमाळ-वणीत पावसाची दमदार हजेरी, पिकांना जीवदान

Madhuri Elephant Nandani Math : माधुरी हत्ती नांदणी मठातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? वनताराकडून सूचनांची आली यादी

SCROLL FOR NEXT