मुंबई : शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची उद्या पुण्यतिथी आहे. यानिमित्त मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी शिवाजी पार्क इथं त्यांच्या स्मारकाला भेट दिली.
त्यांच्या भेटीनंतर त्या ठिकाणी ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर गोळा झाले आणि त्यांनी स्मारकाच्या ठिकाणी शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर धक्काबुक्की आणि घोषणाबाजी करण्यात आली. (Balasaheb Thackeray Death Anniversary activists of Shinde Thackeray group clashed at Shivaji Park)
दोन्ही गटाचे कार्यकर्ते बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर ठाण मांडून असून त्याठिकाणच्या लोखंडी रेलिंगही या वादादरम्यान तोडमोड करण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आता आहे. तर दुसरीकडं ठाकरे गटानं स्मृतीस्थळाचा परिसर गोमुत्र शिंपडून शुद्धिकरणाचा प्रयत्न करण्यात आल्याचं माध्यमातील वृत्तांमधून कळतं आहे. (Latest Marathi News)
बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं जर कोणी शुद्धिकरण करणार असेल तर हे कोण आहेत? कोणाचे दलाल आहेत? शरद पवारांचे आहेत का? शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ही ज्योत तेवत ठेवली आहे ती विझवण्याचं काम ठाकरे गटानं केलं आहे. (Marathi Tajya Batmya)
मग ते इथं कशासाठी आले आहेत? या या कार्यकर्त्यांनी शीतल म्हात्रेंना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला, शोभतं का या लोकांना? मुख्यमंत्री येऊन गेल्यानंतर आम्ही बाळासाहेबांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलो होतो पण या लोकांनी इथले रॉड तोडले आम्हाला मारण्यासाठी असा गंभीर आरोप आमदार सदा सरवणकर यांनी केला.
यावेळी आम्ही शिंदे गट नाहीतर आम्ही शिवसेना आहोत, हे कोण आहेत? यांच्या पक्षाचं नाव काय? असा सवाल यावेळी आमदार शीतल म्हात्रे यांनी केला. तसेच उद्या या ठिकाणी गोंधळ नको म्हणून मुख्यमंत्री शिंदे आज इथं बाळासाहेबांच्या दर्शनासाठी आले. पण यांनी आज इथं यायची गरजच काय होती? हे इतक्या मोठ्या संख्येनं इथं का आले? असा सवालही यावेळी म्हात्रे यांनी केला. (Latest Marathi News)
गेल्या तासाभरापासून शिवाजी पार्कवर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. तसेच मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली आहे. यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यामुळं शिवाजी पार्क परिसरात बरीच गोंधळाची आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.