eknath shinde sakal
मुंबई

Mumbai : छठ पूजेसाठी मुंबईत कृत्रिम तलाव तयार करण्याची बाळासाहेबांच्या शिवसेनेची मागाणी

मुख्यमंत्र्यांचे महानगरपालिकेला कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

मुख्यमंत्र्यांचे महानगरपालिकेला कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश

मुंबई : आगामी छठ पूजेसाठी मुंबईत जागोजागी कृत्रिम तलाव तयार करावे अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्ष्याच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केलेली आहे. या मागणीला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेला छठ पूजेसाठी गणेशोत्सवाप्रमाणेच कृत्रिम तलाव तयार करावेत असे निर्देश दिले आहेत. 

शहरातील नैसर्गिक जलाशय, तलाव यांना बाधा पोहचू नये यासाठी त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन छठ पूजेसाठी पालिका प्रशासनाने आम्हाला कृत्रिम तलाव उपलब्ध करून घ्यावेत अशी मागणी केली होती. या मागणीला अनुसरून बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे, किरण पावसकर आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे समन्वयक आशिष कुलकर्णी यांनी एक निवेदन देऊन छठ पूजेसाठी कृत्रिम तलाव तयार करावेत अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 

गतवर्षी देखील मुंबई महानगरपालिकेने छठ पूजेसाठी काही जागी कृत्रिम तलाव तयार करून भाविकांना ती सोय उपलब्ध करून दिली होती. यंदा देखील तशीच सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उत्तर भारतीय बांधवांकडून करण्यात आली होती. या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांना याबाबत निर्देश दिले असून पालिका प्रशासनाने ही सोय यंदादेखील छठ पूजेसाठी उपलब्ध करून द्यावी असे आदेश दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्लांच्या थेट डोक्याला लावली बंदूक, Z+ सुरक्षा असतानाही घटना; २० वर्षांपासून रचत होता कट

Global Oil Shortage Reasons : सर्वांत मोठा तेलसाठा खुला होणार! ऊर्जासंस्था देणार 40 कोटी बॅरल; वाचा काय आहे 'आयईए'चा प्लॅन?

Farooq Abdullah Attack : फारूख अब्दुल्लांवर हल्ला करणारा कमल सिंग कोण आहे, कशामुळे झाडली गोळी ? सांगितले धक्कादायक कारण

Latest Marathi News Live Update : देशभरात गॅस सिलिंडर टंचाईमुळे लोकांची धावाधाव सुरूच

Beed RTE Admission, Fake Rent Agreements: आरटीई प्रवेशासाठी बनावट भाडेकरार? बीडमध्ये शाळेजवळ ‘पत्ता’ मिळवण्याची स्पर्धा

SCROLL FOR NEXT