मुंबई

Balya Mama Mhatre: खासदारांचा एक फोन अन् दुर्गाडी किल्ल्याची डागडुजी होणार सुरू

Durgadi News: दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेत नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली.

सकाळ वृत्तसेवा

Dombivali News: कल्याणचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वैभव असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम शनिवार पासून सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाची काल पडझड झाली असून भिवंडी लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह दुर्गाडी किल्ल्याची पाहणी केली.

त्यावेळी पी डबल्यू डी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठाणे जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यापासूनच हे डागडुजीचे काम सुरू करण्याचे निर्देश दिले.

दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेश द्वाराजवळील बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळला. विशेष म्हणजे पी डब्ल्यू डी कडून काही वर्षांपूर्वीच या बुरुजाचे काम करण्यात आले होते. हा बुरुज ढासळल्याची माहिती मिळताच आज सायंकाळच्या सुमारास पी डब्ल्यू डी अधिकारी, केडीएमसी अधिकारी आदींच्या उपस्थितीत भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी आधी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गाडी देवीचे दर्शन घेत नंतर या ढासळलेल्या बुरुजाची पाहणी केली.

त्यावेळी अधिकाऱ्यांकडून दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीबाबत संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर त्यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी फोनवर चर्चा केली. आणि लाखो भाविकांचे हे श्रद्धास्थान असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या तातडीने डागडुजीचे महत्त्व त्यांना पटवून दिले.

त्यावर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित पीडब्ल्यूडी च्या अधिकाऱ्यांना फोनवरच उद्यापासून लगेचच किल्ल्याची डागडुजी सुरू करण्याचे आदेश दिल्याचे दिसून आले. त्यामुळे किल्ल्याच्या डागडुजीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी स्पष्ट केले.

तर आपल्याला मतदारसंघात कामांचा दर्जा आणि गुणवत्तेशी तडजोड न करता चांगले काम करायचे आहे. त्यामुळे आपण विकासकामांसाठी कोणाकडूनही एक रुपया घेणार नाही. जर काम चांगले केले नाही तर, मग तो कंत्राटदार असो की शासकीय अधिकारी, त्यांचा कोणताही मुलाहिजा न ठेवता त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असा सज्जड दमही सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी यावेळी बोलताना दिला.

तर खासदारकीची शपथ घेऊन झाल्यानंतर आपण कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पाहणी दौऱ्यावर येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या पाहणी दौऱ्यामध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख सचिन बासरे, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त प्रल्हाद रोडे, पी डब्ल्यू डी अधिकारी प्रीतीश पराळे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Science Day Special : विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची भरारी! 2026 चे खास मिशन जगभर चर्चेत; भारतीयांचा ऊर भरून येईल अशी कहाणी

Ajit Pawar: ‘दादा परत या...’ बारामतीकरांची आर्त हाक; महिन्यानंतरही भावना ताज्याच

Uttarakhand Holi: होळीच्या रंगात न्हाली देवभूमी,धामींची कोट्यवधींच्या प्रकल्पांची मोठी भेट पाहा काय आहे मुख्यमंत्र्यांचा मेगा प्लॅन?

12th Student Death : नियतीचा क्रूर खेळ! बारावी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या विद्यार्थिनीचा Heart Attack ने मृत्यू; परीक्षेपूर्वी 'असं' काय घडलं? हातात पेन घेण्यापूर्वीच...

SCROLL FOR NEXT