corona-mumbai.jpg 
मुंबई

वांद्रे, चेंबूरमध्ये सप्टेंबर-ऑक्टोबर पेक्षा कोरोनाचे जास्त रुग्ण

दीनानाथ परब

मुंबईत सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग जास्त होता. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये चेंबूर आणि वांद्रे भागात जितके कोरोना रुग्ण आढळत होते, त्यापेक्षा जास्त संख्येने आता या भागांमध्ये  कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. महापालिकेच्या आकडेवारीवरुनच ही बाब समोर आलीय. चेंबूर-वांद्रे भागात सप्टेंबर-ऑक्टोबर पेक्षा जास्त रुग्णवाढ होत असली, तरी मृत्यूचे प्रमाण मात्र कमी असल्याचे या भागातील डॉक्टरांनी सांगितले. कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले आमच्याकडे ६० रुग्ण आहेत. त्यापैकी नऊ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून ते व्हेंटिलेटरवर आहेत असे डॉ. प्रिन्स सुराना यांनी सांगितले. चेंबूरमध्ये त्यांचे रुग्णालय आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीला २० रुग्ण दाखल होते. पण आता रुग्ण संख्या पुन्हा वाढली आहे. 

फेब्रुवारीमध्ये रुग्ण संख्या घटल्याने आम्ही अन्य आजारांवर काम सुरु केले होते. पण आता आम्हाला महापालिकेने पुन्हा एकदा कोरोनासाठी बेड सज्ज ठेवण्यास सांगितले आहे, असे उपनगरातील एका डॉक्टरने सांगितले. लोकांनी कोरोना नियमांचे पालन न केल्यामुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढली, असे एम-पश्चिम आणि एच-पश्चिम विभागाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले. एम-पश्चिममध्ये चेंबूर, टिळकनगर हा भाग येतो. सप्टेंबर महिन्यात एम-पश्चिम वॉर्डमध्ये दररोज ८५ कोरोनाबाधित आढळायचे. मागच्या महिन्यात काही दिवस दिवसाला ९४ रुग्ण आढळत होते. एम-पश्चिमेला वाढदिवस, कौटुंबिक सोहळे मुक्तपणे सुरु होते. मागच्यावर्षी याच कार्यक्रमांवर बंधने होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. 

एच-पश्चिमेच्या वॉर्डमध्ये वांद्रे, खार, सांताक्रुझ हा भाग येतो. रुग्णसंख्या वाढत असली, तरी इथे मृत्यूदर शुन्य आहे. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात एच-पश्चिम वॉर्डमध्ये दिवसाला ४५ ते ५० कोरोना रुग्ण आढळून येते होते. आता तेच प्रमाण ६५ ते ७० आहे. एम-वेस्टचा कोरोना वाढीचा दर ०.५७ टक्के आहे, तर एच-वेस्टचा ०.५३ टक्के आहे. संपूर्ण मुंबईचा कोरोना वाढीचा सरासरी दर ०.४२ टक्के आहे. त्यापेक्षा या दोन वॉर्डचा रुग्णवाढीचा वेग जास्त आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nalasopara Kalamb Beach Incident : नालासोपाऱ्यात कळंब समुद्रकिनारी रिल स्टार समुद्रात बुडून बेपत्ता; गणेश विसर्जनाचे व्हिडिओ बनवताना घडली दुर्दैवी घटना

Gold Rate Today: सप्टेंबरअखेर सोनं 11 हजारांनी स्वस्त! खरेदीदारांना दिलासा; मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात भाव किती?

Latest Marathi News Live Update : लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल; २२ तासांपासून विसर्जन मिरवणूक, थोड्याच वेळात बाप्पाला निरोप

प्रेमानंद महाराजांच्या शिष्याने इमारतीवरून मारली उडी, प्रायव्हेट पार्ट कापलेला; वृंदावनात घटनेने खळबळ!

IPS Mohibullah Ansari : कोण आहेत मोहिबुल्लाह अंसारी? अमेरिकेत मिळणार ‘एशियन हिरो अवॉर्ड’; जाणून घ्या IPS अधिकाऱ्याचा प्रेरणादायी प्रवास

SCROLL FOR NEXT