sealink.jpg 
मुंबई

वांद्रे-वरळी सी-लिंकच्या तारांवर चढून स्टंट, दोघांना अटक

अनिश पाटील

मुंबई: वांद्रे-वरळी सीलिंकच्या तारांवर चढून स्टंट करणा-या रशियन नागरीकांना वरळी पोलिसांनी नुकतीच अटक केली. समाज माध्यमांवर छायाचित्र अपलोड करण्यासाठी त्यांनी हे स्टंट केल्याचे सांगितले. दोघेही सर्कसमध्ये काम करणारे असून विविध देशात जाऊन स्टंटचे चित्रीकरण करतात.

मकसिम स्केर्बाकोव्ह(24) व वसीली कोलेसेनिकोव्ह(30) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. दोघांनीही 7 मार्चला टॅक्सी भाड्याने घेतली होती. त्यानंतर मध्यावर टॅक्सी सोडून त्यांनी स्टंट करण्यास सुरूवात केली.त्यानंतर मकसिम सी-लिंकच्या तारांवर चढला. तर वासिली चित्रीकरण करत होता. त्यावेळी एका नागरीकाना हा प्रकार पाहिला. त्याने पोलिस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांनी आपण स्टंटमन असून जगभरात फिरून असे स्टंट करतो असे सांगितले. तसेच त्यानी आपला इन्स्टाग्राम अकाउंटही दाखवले. त्यातील छायाचित्रे दाखवली. 

त्यांनी भारतातील इतर ठिकाणीही असे स्टंट केले आहे.पण सी-लिंकवर तारावर चढणे बेकायदा असल्याचे सांगून त्यांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली. ते गेल्या एकवर्षापासून भारतात राहत होते त्यांनी  मनाली, लदाख, दिल्ली, गोवा अशा ठिकाणांनाही भेट दिली आहे. गोव्यावरून ते मुंबईत आले होते. मकसिमच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 1500 फॉलोवर आहे. दुबई, बँकॉक व दिल्लीमध्येही त्यांनी अशाप्रकारे स्टंट केले आहेत. त्याच्याविरोधात भादंवि कलम 188, 336 सह परदेशी नागरीक कायद्या अंतर्गत त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संपादन - दीनानाथ परब)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT