Mumbai High Court sakal media
मुंबई

बॅंकेत जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्या खातेदाराला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

सुनिता महामुनकर

मुंबई : बॅंकेच्या कामाची वेळ संपल्यानंतर बॅंकेत (bank) जबरदस्तीने प्रवेश करणाऱ्या खातेदाराला (account holder) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) जामीन मंजूर केला आहे. मात्र खातेदाराने मुख्यमंत्री (chief minister fund) सहाय्यता निधीसाठी दहा रुपये जमा करावे, असे आदेश न्यायालयाने दिले. (bank-account holder-Mumbai high court-chief minister fund-nss91)

सोलापूर मधील सांगोला पोलीस ठाण्यात याबाबत बैक औफ इंडियाच्या वतीने फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोविडच्या निर्बंधांमुळे कामाची वेळ सांयकाळी चार वाजेपर्यंत होती. त्यानंतर बाहेरून कोणी जाऊ शकत नाही आणि आतील खातेदार काम पूर्ण करु शकतात. एप्रिल मध्ये घडलेल्या या घटनेनुसार संबंधित खातेदार सव्वा चारच्या सुमारास बैकेच्या प्रवेशद्वारवर आला होता. तेथील काचेच्या दरवाजा वाजवून ते आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते.

मात्र त्यांना आत घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला. बैकेच्या कर्मचारी आणि व्यवस्थापकांनी जाऊन त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र खातेदार काचेच्या दरवाजावर वाजवत राहिले ज्यामुळे पंचवीस हजार रुपयांचा दरवाजा तुटला. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे अटक होऊ शकते या कारणावरून त्यांनी जामीन मिळण्यासाठी अर्ज केला. संबंधित प्रकार नकळत घडला आणि त्याबाबत दिलगीर आहे, असे त्यांच्या वतीने न्यायालयात सांगण्यात आले. तसेच याचा पश्चाताप करण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत करेन, असेही त्यांच्या वतीने एड राहुल कदम यांनी सांगितले. न्या भारती डांग्रे यांनी या विधानाला मान्यता दिली आणि दोन आठवड्यात पैसे जमा करण्याचे आदेश दिले. तसेच खातेदाराला वीस हजार रुपयांचा जामीन मंजूर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: दिल्लीत पुन्हा पेटणार आंदोलन? पोलिसांनी गुन्हे मागे न घेतल्याने नव्या आंदोलनाचा इशारा

शब्दांनी मनात वादळ उठलं, एका व्हिडिओने देशाला विचार करायला भाग पाडलं, जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान नेमका कोण?

Latest Marathi News Live Update: तितंबा आश्रमशाळेतील ६९ मुलांना पोटदुखी आणि मळमळीचा त्रास जाणवला

Riya Ahir: सतत धमक्या आणि शिवीगाळ, मुंबई पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिरचा ऑनलाईन छळ; सायबर सेलकडे धाव

Vitthal Ban Cleanliness Drive : ‘विठ्ठल बन’ डाळींब येथे १६० ग्रामदूतांनी २ तासांत ६ टन कचरा हटवून मंदिर परिसर चकाचक

SCROLL FOR NEXT