bank loan sakal media
मुंबई

छोटे व्यापारी आता उद्योजक; बॅंक कर्ज मिळणं होणार सोपं

कृष्णा जोशी

मुंबई : कोरोनाचा दणका बसलेल्या (corona Impact) छोट्या व्यापाऱ्यांना एमएसएमई (सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योजक) दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्र सरकारने (Central Government) घेतला असून व्यापारी संघटनांनी (Traders Union) त्या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निर्णयामुळे व्यापाऱ्यांना बँकांची कर्जे मिळणे सोपे होणार आहे. लॉकडाऊनमुळे बिगर अत्यावश्यक सेवांची दुकाने बराच काळ बंद ( corona Lock down ) असल्याने त्यांना मोठा तोटा झाला होता. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांना सवलती देण्याची मागणीही त्यांच्या संघटनांनी अनेकदा केली होती. त्यानुसार आज एमएसएमई खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी हा निर्णय जाहीर केला. यासंदर्भातील मार्गदर्शक तत्वांची फेररचना करण्यात आली असून त्याचा फायदा देशातील चार कोटींपैकी अडीच कोटी रिटेल व होलसेल व्यापाऱ्यांना (Wholesale And retail traders) होईल. त्यांना आता रिझर्व्ह बँकेच्या निकषांनुसार प्राधान्याने कर्जपुरवठाही होईल. ( Bank Lone easily available to small traders converts as businessman)

या निर्णयामुळे या व्यापाऱ्यांना उद्यम आधार पोर्टलवर नोंदणी करता येईल व त्यामुळे मिळणारे लघु-सूक्ष्म उद्योजकांचे फायदेही घेता येतील. तसेच त्यांना लघुद्योजक दर्जा मिळाल्याने बँकांची कर्जे, सरकारी योजना-सवलती यांचाही लाभ त्यांना घेता येईल. या उद्योजकांसाठी असलेल्या सरकारी महामंडळाच्या विकास योजनांमध्येही त्यांना सहभाग घेता येईल. त्यायोगे त्यांना आपल्या व्यवसायाची वाढ व पुनर्रचनाही करता येईल.

रिटेलर्स असोसिएशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी या निर्णयाचे स्वागत केले असून याबद्दल त्यांनी गडकरी यांचे आभारही मानले आहेत. नव्यानेच स्थापन झालेल्या ट्रेडर्स युनायटेड फोरम ऑफ महाराष्ट्रचे संतोष मंडलेचा, विरेन शहा आदींनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे.

या निर्णयामुळे एमएसएमईचा दर्जा मिळालेल्या या छोट्या व्यापाऱ्यांचे सबलीकरण होण्यास व त्यांचा आर्थिक विकास होण्यास मदत होईल. या व्यापाऱ्यांना उद्यम आधार पोर्टलवर नोंदणी केल्यावर लाभ मिळणार असल्याने त्यांनी उद्यम आधार पोर्टलवर नोंदणी करावी असे आवाहन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले आहे. उद्योजक दर्जा मिळाल्याने आता व्यापाऱ्यांची पुढची पीढी आनंदाने व्यवसायात येईल. ज्यांना नवे उद्योग, नव्या आधुनिक प्रकारे करायचे आहेत त्यांना, तसेच इ कॉमर्स व्यापाराच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांना या दर्जाचा उपयोग होईल, असे फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष विरेन शहा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT