Bank privatization issue sakal media
मुंबई

मुंबई : बँक खाजगीकरणाच्या विरोधात कर्मचाऱ्यांचा तीव्र संघर्षाचा निर्धार!

प्रशांत कांबळे

मुंबई : मुंबई येथील आझाद मैदानात (Azad Maidan) दोनशेवर बँक कर्मचारी (Bank Employees) तसेच अधिकारी प्रतिनिधींच्या सहभागातून सरकारतर्फे बँकिंग कायद्यात (Bank Act) ज्या दुरुस्ती प्रस्तावित करण्यात येत आहेत ज्यामुळे सार्वजानिक क्षेत्रातील (Public sector bank) बँकांचे खाजगीकरण (Bank Privatization) शक्य होईल, त्याच्या विरोधात धरणे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता ज्यात दोनशेवर बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी झाले होते.

धरणे कार्यक्रमाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे एस एम दौंड, सर्वसाधारण विमा कर्मचारी संघटनेतर्फे कॉम्रेड ललित सुवर्ण, हिंद मजदूर सभेचे साथी अशोक जाधव, आयटकच्या वतीने कॉम्रेड बबली रावत इत्यादी संघटनांचे प्रतिनिधी यांनी उपस्थित नोंदविली. या धरणे कार्यक्रमास उद्देशून बोलताना अयबोक चे कॉम्रेड निलेश पवार, मनोज वडावकर, इनबोक च्या वतीने कॉम्रेड योगेश शिका, इंनबेफ च्या वतीने ईश्वर पुथरन, एनसीबीईच्या वतीने कॉम्रेड जगदीश शृंगारपुरे एआयबीओए च्या वतीने कॉम्रेड विश्वनाथन, एआयबीइए चे वतीने कॉम्रेड ललिता जोशी, कॉम्रेड शंकर कॉम्रेड नंदकुमार चव्हाण, कॉम्रेड देवीदास तुळजापूरकर इत्यादींनी बँक खाजगीकरण विरोधातील आंदोलनाला आता जनआंदोलन करण्यात येईल व ही लढाई व्यापक बनवलि जाईल असे सांगितले.

या वेळी दोनशेवर बँक कर्मचारी उपस्थीत होतें.उपस्थितांनी बँक कर्मचारी सेना या बँक खाजगीकरण विरोधातील लढाईत सहभागी होत आहे याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. या धरणे कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लातूर, सांगली, सिंधुदुर्ग, नाशिक, नवी मुंबई, ठाणे, पुणे येथून बँक कर्मचारी जथ्यानी आले होते. या जथ्यातील बँक कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील अनेक गावात, वस्त्यात, बाजारात जाऊन बँक खाजगीकरणाला विरोध का ? ही बँक कर्मचारी संघटनेची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविली व त्यांचा खाजगीकरण विरोधी अभियानाला पाठिंबा मिळविला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन तर्फे आता 16 आणि 17 डिसेंबर दोन दिवसांच्या संपाची हाक दिली आहे ज्यात बँकिंग उद्योगातील नऊ लाख बँक कर्मचारी तसेच अधिकारी सहभागी होत आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT