Uddhav Thackeray vs Eknath Shinde esakal
मुंबई

एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात झळकले उद्धव ठाकरे यांच्या शुभेच्छांचे बॅनर

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट पडले आहेत. ठाण्‍यातून वाढदिवसानिमित्त शहरात शुभेच्छांचे बॅनर लागतील का, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा बॅनर ठाण्यात झळकल्यानंतर त्यापाठोपाठ कळव्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातही शुभेच्छांचे बॅनर लावण्यात आले आहेत; मात्र त्यावर कोणाचेही नाव टाकण्यात आलेले दिसून आले नाही.

उद्धव ठाकरे आणि शिंदे हे आता वेगळे झाले आहेत. आमदारांसह खासदारांनीही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ठाकरे यांची शिवसेना आता कमी होताना दिसत आहे. अशातच दरवर्षी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यासह जिल्ह्यात त्यांना शुभेच्छा देणारे बॅनर लागत होते. यंदा मात्र त्याचे प्रमाण फारच नगण्य झाल्याचे दिसून आले आहे. सोमवारी ठाण्यातील जांभळी नाका परिसरात खासदार राजन विचारे यांनी ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर लावले होते. त्यापाठोपाठ मंगळवारी कळव्यातील विविध भागांत ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आले आहेत; तर कोपरीत म्हणजेच मुख्यमंत्री शिंदे यांच्याच मतदारसंघात ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर लावण्यात आल्याने आश्र्चर्य व्यक्त होत आहे. या बॅनरवर शिवसेना कोपरी विभाग एवढेच नाव शुभेच्छुक म्हणून देण्यात आले आहे; मात्र इतर कोणत्याही पदाधिकारी अथवा कार्यकर्त्यांची नावे त्यात दिसून आलेली नाहीत. त्यामुळे ते बॅनर कोणी लावले याची चर्चा कोपरी भागात सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Oman Sea Attack : ओमानच्या समुद्रात इराणचा हल्ला; भारतीय जहाज लक्ष्य, तीन जणांचा मृत्यू

Iran-Israel War: खामेनेई यांचं भारतातल्या 'या' गावाशी होतं खास कनेक्शन; मृत्यूची बातमी कळताच गावावर शोककळा

Beetroot Sprouts Chilla: सकाळचा नाश्ता हेल्दी आणि हटके हवाय? मग हा बीट-स्प्राऊट्स चिला एकदा ट्राय कराच!

इराणच्या हल्ल्यातून थोडक्यात वाचला ध्रुव राठी, पहाटे दुबई विमानतळावरून केलं होतं उड्डाण, कुटुंबीय अजूनही अडकलेले

भाजप की राष्ट्रवादी? अमरावती मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे? 'या' दिवशी होणार निर्णय, सभापती पदासाठी महायुतीत चढाओढ

SCROLL FOR NEXT