barge-lost 
मुंबई

भर समुद्रात बार्ज भरकटलं; मुंबईतून दोन युद्धनौका रवाना

बार्जवर २७३ खलाशी आणि कर्मचारी अडकले

कृष्णा जोशी

मुंबई: अरबी समुद्रातील चक्रीवादळामुळे एक मोठा बार्ज आज सकाळी भरकटला. तो बार्ज मुंबई हायमधील हिरा तेल उत्खनन विहिरींच्या दिशेने भरकटत चालल्याने मुंबईतून दोन युद्धनौका तेथे निघाल्या. या बार्जवर 273 खलाशी व कर्मचारी आहेत. तांत्रिक बिघाडामुळे अनियंत्रित झालेला हा बार्ज तेल विहिरींवर धडकल्यास दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे ही बाब संवेदनशील असल्याची माहिती आहे. अशा परिस्थितीत नौदलाच्या दोन बोटी बार्जची सुटका करण्यासाठी समुद्रात आहेत. (Barge boat with 273 sailors out of control in sea INS Kochi INS Talwar on Field for rescue)

२७३ खलाशी असलेल्या बार्जमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी किंवा त्याला सुरक्षित किनाऱ्यावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. बार्ज योग्य दिशेने जात असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे आता बार्ज अनियंत्रित झालं आहे. नौदलाची कोची ही युद्धनौका दुपारी एक वाजताच्या सुमारास मुंबईच्या नौदल गोदीतून रवाना झाली. समुद्र खवळलेला असताना आणि वादळी वारे वाहत असताना INS तलवार ही दुसरी युद्धनौकाही थोड्या वेळात मुंबईतून निघणार आहे. पहिली युद्धनौका दुपारी चार वाजण्याच्या सुमारास या बार्जजवळ जाईल. त्यानंतर परिस्थितिनुसार हा बार्ज सुरक्षित किनार्‍यावर आणला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

MS DHONI CSK STAKE CONTROVERSY: धोनीला CSKमध्ये २५ टक्के हिस्सा हवा होता? दाव्याने खळबळ, आकाश चोप्रांनी सांगितलं नेमकं सत्य

‘मराठी डाऊनमार्केट भाषा आहे असं सांगण्यात आलं’ चिन्मयी सुमीत यांनी सांगितला मुंबईतील जीमचा धक्कादायक अनुभव

सणासुदीत अन्नसुरक्षेवर FDAची नजर! शाळा, अंगणवाड्यांसह सेंट्रल किचनची तपासणी; नवे आदेश जारी करणार

Marathi News Live Updates : जर मला एखाद्याला विरोध करायचा असेल, तर तसा करण्याचा मला पूर्ण अधिकार आहे - मिलिंद देवरा

SCROLL FOR NEXT