बंसत रानी फुलांची गुलाबी चादर  sakal
मुंबई

Mumbai News : इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बंसत रानी फुलांची गुलाबी चादर !

मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी परिसरात 'बसंत रानी' नावाने ओळखले जाणारी झाड सध्या फुलाने बहरली असल्याने मुंबईकरांना या फुलांनी भुरळ घातली आहे.

जीवन तांबे - सकाळ वृ्त्तसेवा

चेम्बूर- मुंबईतील पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडा नगर ते विक्रोळी परिसरात 'बसंत रानी' नावाने ओळखले जाणारी झाड सध्या फुलाने बहरली असल्याने मुंबईकरांना या फुलांनी भुरळ घातली आहे. महापालिकेने आपल्या क्षेत्रात सहा हजरापेक्षा अधिक 'बसंत रानी' वृक्ष लावले आहेत.

समावेश आहे. हिंदी भाषेत 'बसंत रानी' अशी ओळख असणाऱ्या या झाडाला शास्त्रीय नाव 'टॅब्यूबिया पेंटाफायला' तर इंग्रजीमध्ये 'पिंक ट्रंम्पेट, पिंक पाऊल, पिंक टिकोमा' अशा विविध नांवाने ओळखलं जात आहे.

इस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दुतर्फा आणि दुभाजकावर पर्यावरण आणि सुशोभिकरणासाठी लावण्यात आलेली विविध बसंत रानी दरवर्षीप्रमाणे यंदाही बहरली आहेत. एकूण 25 ते 30 पेक्षा अधिक फूट उंच असलेल्या झाडांना दरवर्षी साधारणपणे वसंत ऋतूत बहर येतो. यावर्षी वसंत रानी झाडे फुलांनी बहरली आहेत.

बसंत रानी झाडे गुलाबी फुलांनी बहरली असल्याने जणूकाय इस्टर्न एक्स्प्रेस हायवे व परिसरात गुलाबी चादर पसरलेली दिसत आहे.फुलांनी बहरलेली 'बसंत रानी' ची झाडं प्रवासी, नागरिक आणि पुष्पप्रेमीं यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

प्रतिक्रिया-

या मार्गावरुन प्रवास करताना फुले पाहुन मनाला आल्हादायक वाटते. मन प्रसन्न होते.सुट्टी च्या दिवसी कुटुंबासह या ठिकाणी येतो.पालिकेने अशी विविध प्रकारची झाडे लावणे गरजेचे आहे.

-अरुण जाधव

फुलांमध्ये सौंदर्याचा खजिना लपलेला आहे. त्यामुळे विविध फुले व फुलांच्या सुंगन्ध चा सर्वाना आकर्षण असते. मला ही आहे. बसंत रानी फुलांची पसरलेली चादर पाहुन मन मोहन जाते.

-समीक्षा भोसले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT