मुंबई

आयोगाच्या आदेशाला केराची टोपली

सकाळ वृत्तसेवा

पनवेल : बीएलओ (बुथ लेव्हल ऑफिसर) म्हणून नेमणूक झालेल्या शिक्षकांना रविवारपासून मतदार स्लिप वाटण्याचे काम देण्यात आले आहे. या कामाकरिता पूर्ण वेळ सुट्टी न देणाऱ्या मुख्याध्यापकांविरोधात कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा दिल्यानंतरही पनवेलमधील अनेक शाळांनी बीएलओ शिक्षकांना पूर्ण वेळ सुट्टी दिली नाही. शाळांमध्ये आपले शिकवण्याचे काम करूनच स्लिप वाटपाचे काम करावे लागत असल्याने शिक्षकांकडून नाराजी व्यक्‍त करण्यात येत आहे.

बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांना मतदारांपर्यंत वेळेत मतदार स्लिप पोहोचवता याव्यात, याकरिता शाळांनी शिक्षकांना रविवार (ता.१३) पासून सुट्टी देण्याचे निर्देश आयोगामार्फत देण्यात आले आहेत. निवडणूक आयोगातर्फे मतदारांपर्यंत स्लिप पोहोचवण्यासाठी शिक्षकांची मदत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयोगाच्या या निर्णयानुसार पनवेल विधानसभा मतदारसंघातील विविध शाळांमधील ५७६ शिक्षकांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्यामार्फत ५,५७,३२४ व्होटर स्लिपचे वाटप केले जाणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तात्रय नवले यांनी दिली होती. नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार स्लिप वाटप करण्याच्या कामात हलगर्जी करणाऱ्या शिक्षकांविरोधात आणि शिक्षकांना पूर्णपणे सुट्टी न देणाऱ्या शाळांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

फोनवर बोलण्यात तरुणी एवढी मग्न होती की.. विषारी फूल खाल्ल्याने तडफडून झाला मृत्यू

IPL 2024 Points Table: 16 पाँइंट्स अन् केवळ तीनच पराभव, तरी कोलकाता-राजस्थानला अद्यापही का मिळालं नाही प्लेऑफचं तिकीट?

Google Wallet: गुगल वॉलेट भारतात लाँच; Google Payपेक्षा कसे आहे वेगळे, करता येणार 'ही' महत्त्वाची कामे

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

SCROLL FOR NEXT