मुंबई

बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

नामदेव कुंभार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही उपस्थिती होते. आदित्य ठाकरे, किशोरी पेडणेकर, नवाब मलिक, बाळासाहेब थोरात आणि मुंबईचे पालकमंत्री आस्लम शेख यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ऑनलाइन या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती. वरळी येथील जांबोरी मैदानाच हा कार्यक्रम झाला.

वरळी, नायगाव, ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींचा भूमिपूजन सोहळा २२ एप्रिल २०१७ रोजी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वरळी येथील जांबोरी मैदानात झाला होता. या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. या प्रकल्पासाठी म्हाडाने बांधकामासाठी कंत्राटदारांची नेमणूक केली असून प्रकल्पाचे काम सुरू करण्यास महाविकास आघाडीतील नेत्यांना वेळ मिळाला नव्हता. अखेर 27 जुलैला वरळी पुनर्विकासाच्या बांधकामाच्या इमारतीचा शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला होता. यादरम्यान पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींच्या बांधकामाचा शुभारंभ पुढे ढकलण्यात आला होता.आज अखेर याला मुहर्त लागला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीडीडी चाळीच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळा पार पडला.

बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता या प्रकल्पाकडे नागरी पुनरुत्थानाचा आशिया खंडातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून पाहिले जात आहे. वरळी, एन. एम. जोशी मार्ग परळ, नायगाव आणि शिवडी येथे सुमारे 92 एकर जागेवर बीडीडी चाळींची उभारणी करण्यात येणार. पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिका विनामूल्य मिळणार आहे. वरळी येथे सर्वाधिक म्हणजे 121 चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून 9 हजार 689 पुनर्वसन सदनिका (निवासी 9394 + अनिवासी 295) बांधण्यात येणार आहेत.

‘एकही वीट रचू देणार नाही’

रहिवाशांच्या मागण्या मान्य करून त्याबाबतचा शासन निर्णय सरकार जोपर्यंत काढत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. सरकारने रहिवाशांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास बीडीडी प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, असा इशारा अखिल बीडीडी चाळी सर्व संघटनांचा एकत्रित संघाचे अध्यक्ष डॉ. राजू वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: “चहा घेणार का? मी बनवतोय" FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ज्याच्यासाठी बनवला चहा तो मित्र कोण?

जे बात! हात हातात येणार, शरूच्या प्रेमात शायनरची विकेट पडणार; 'सनई चौघडे' मध्ये नवा ट्विस्ट, प्रोमो पाहून प्रेक्षक खुश

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

Marathi News Live Updates : झारखंड लोकसेवा आयोगाच्या माजी अध्यक्षांना अटक; CID ने घेतलं ताब्यात

SCROLL FOR NEXT