मुंबई

सावधान! शरीरावर जंतूनाशक फवारणीने तुमच्या आरोग्याला धोका; परंतु कोरोना विषाणूवर फारसा परिणाम नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिकठिकाणी जंतूनाशकांची फवारणी केली जात आहे.परंतु,त्यामुळे मानवी शरीरावर विपरित परिणाम होत असून, विषाणूला चाप बसत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे. बाजार, छोट्या गल्ल्या, झोपडपट्ट्यांमधील अस्वच्छता आणि हवेतील धूलिकणांमुळे जंतूनाशक फवारणीचा काहीही उपयोग होत नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.कोरोनाचा प्रसार कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात जंतूनाशकांची फवारणी होत आहेत.ही फवारणी कोरोना विषाणूला रोखण्यासाठी परिणामकारक नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.शरीरावर केली जाणारी जंतूनाशकाची फवारणी धोकादायक असून, गंभीर आजार होण्याचा धोका आहे, असेही जागतिक आरोग्य संघटनेने स्पष्ट केले आहे.

काय होतात दुष्परिणाम?

धूळ आणि अस्वच्छतेमुळे जंतूनाशके निष्क्रीय होऊ शकतात.शरीरावर जंतूनाशक फवारल्यास गंभीर आजारांचा धोका असतो.त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दुखणी उद्भवू शकतात.क्लोरीनसारख्या रसायनांची फवारणी डोळे आणि त्वचेसाठी धोकादायक ठरू शकते.त्यामुळे डोळे व त्वचेची जळजळ, श्वास घेण्यास अडथळा आणि पोटाचे विकार, असा त्रास होऊ शकतो. प्रतिक्रिया जंतूनाशकाच्या फवारणीमुळे डोळे चुरचुरणे, त्वचेला खाज येणे, श्वास घ्यायला त्रास होणे, असे दुष्परिणाम होऊ शकतात.भाज्यांवरील जंतूनाशक फवारणी धोकादायक ठरू शकते.त्यामुळे भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्याव्यात. -

डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar record victory : सुनेत्रा पवार देशात सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या ठरल्या आमदार, बारामतीचा आतापर्यंतचा निकाल घ्या जाणून

RCB ला मोठा धक्का! IPL 2026 सुरू असतानाच स्टार ओपनर अचानक इंग्लंडला झाला रवाना; नेमकं काय घडलं?

Kerala Election 2026 Results : केरळमध्ये १० वर्षांनंतर सत्तांतर, आता मुख्यमंत्री कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष; 'ही' २ नावे चर्चेत

Assembly election results 2026 Live Update : ५ टप्प्यांच्या मतमोजणीनंतर ममता बॅनर्जी यांची २५,९४२ मतांसह मोठी आघाडी

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार मार्च-एप्रिलचा हप्ता? महत्त्वाची अपडेट समोर...

SCROLL FOR NEXT