मुंबई

सॅनिटायझरचा वारंवार उपयोग करत असाल तर वेळीच सावध व्हा; त्वचेची गंभीर अँलर्जी होण्याची शक्यता

मिलिंद तांबे

मुंबई : कोरोनाचे संक्रमण वाढले आणि गेल्या काही महिन्यांपासून सॅनिटायझरचा वापर मोठ्या प्रमाणात सुरू झाला. त्यामुळे साबण लावून हात धुण्याची सवय बाजूला पडत आहे. सॅनिटायझरचा अतिरेक होत असल्याने हातांच्या स्किनचे त्रास वाढले आहेत. त्यामुळे कंटाळा न करता साबणाने हात धुण्याची सवय सोडू नका असे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. लोक घराबाहेर पडताना आजकाल सॅनिटायझरच्या छोट्या बाटल्या सोबत ठेवतात. वेळोवेळी हातांना सॅनिटायझर लावून निर्जंतुकीकरण केले जाते. कोरोनापासून बचाव करण्यासाठी ही एक चांगली सवय आहे.  गाडी चालवताना, कारमध्ये किंवा पाणी उपलब्ध होणार नाही, अशा ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करणे ही चांगली कल्पना आहे. पण पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हात पाण्यानेच धुतले पाहिजेत. याकडेही नागरिकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. 

सध्या सॅनिटायझरची सवय लागल्याने नागरिक घरातही साबण लावून हात धुण्यास टाळाटाळ करत आहेत. साबण लावून हात धुण्यासाठी जास्त वेळ जात असल्याने नागरिक घरात असतानाही सॅनिटायझरचा वापर करू लागले आहेत. मात्र घरात असताना तसेच पाण्याची सोय असलेल्या ठिकाणी साबण लावूनच हात धुण्यावर नागरिकांनी भर देणे गरजेचे असल्याचे पालिका मुख्य रुग्णालयाचे संचालक डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.

सॅनिटायझरचा अति वापरामुळे स्किन कोरडी होते, स्किनला रिऍक्शन येतात अनेकदा स्किन पातळ होऊन फाटते, अँलर्जी होऊ शकते. त्यामुळे गरजेच्या वेळी सॅनिटायझरचा वापर नक्की करा. मात्र तुमच्या घरात ऑफिस मध्ये तसेच पाणी आणि साबणाची उपलब्धता असलेल्या ठिकाणी हात साबणाने धुणे केव्हाही चांगले. किंबहुना आपण स्वच्छतागृहांचा वापर केल्यानंतर किंवा जेवणा आधी हात पाण्याने स्वच्छ धुणे हीच योग्य पद्धत हात स्वच्छ करण्यासाठी वापरावी असे डॉ. भारमल सांगतात.

हात धुताना या गोष्टी लक्षात ठेवा-

  • -हात धुताना किमान 20 सेकंदाचा नियम पाळा
  • - सतत हात धुवा
  • - सॅनिटायझरचा वापर कमी करा आणि साबणाचा वापर जास्त करण्याचा प्रयत्न करा.

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur News : सत्तेसाठी टोकाचे राजकारण; विरोधकांचा पत्ता कापण्यासाठी अनधिकृत बांधकाम ठरणार हत्यार

IPL 2026: सॅमसनमुळे ऋतुराजचे सलामीचे स्थान गेले...! अश्विनने निवडलेल्या CSK च्या प्लेइंग १२ मध्ये दिसेल नवीन ओपनिंग जोडी

VIDEO: धावत्या लोकलमधून तरुणीला फेकलं, नवी मुंबईतील धक्कादायक घटना, व्हिडिओ व्हायरल

Lionel Messi India Tour : 3 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी लिओनेल मेस्सीला किती कोटी रुपये मिळाले? पोलिस तपासात आयोजकाचा खुलासा

Latest Marathi News Live Update : मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकात बैठक सुरू

SCROLL FOR NEXT