माहीम चौपाटीवर  
मुंबई

माहीम चौपाटीवर बहरतेय सुरूची बाग! पालिकेकडून सुशोभीकरण; कचऱ्याचे ढीग, दुर्गंधीपासून लवकरच मुक्तता

रजनीकांत साळवी

प्रभादेवी : कचऱ्याचे ढीग, दुर्गंधी हे माहीम चौपाटीवरील चित्र आता बदलणार आहे. निळ्याशार समुद्राच्या सोबतीने आता सुरूची बाग चौपाटीचे सौंदर्य खुलवणार आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या मुंबईकरांना अजूनही मोकळा श्‍वास घेता येणार आहे. पालिकेच्या जी उत्तर विभागाने यासाठी पुढाकार घेतला असून, माहीमच्या रेतीबंदर चौपाटीवर सुरूची बाग तयार करण्याचे काम प्रगतिपथावर असून, पालिकेच्या मोहिमेमुळे बकाल होत चाललेल्या चौपाटीला नवजीवन मिळणार आहे. 

माहीम चौपाटी, रेतीबंदर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले होते; मात्र हे चित्र लवकरच बदलणार आहे. चौपाटी परिसरात पर्यावरणाला पोषक ठरतील अशी सुरूची झाडे लावण्याचे काम सुरू असून, त्या ठिकाणी वाळूचा भराव टाकण्यात येणार आहे. सध्या माहीम चौपाटी परिसरात 250 सुरूची झाडे, 200 चाफा, 350 बांबू व 350 टिकोमाची झाडे लावणे सुरू आहे. परिसरात बांबूचे पार्टिशन करण्यात येणार आहे. या ठिकाणी एक उंच घड्याळ टॉवरही उभारणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. पालिकेने हाती घेतलेल्या कामाला स्थानिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रालाही चांगली चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. 

"बांबूचा परिसर'पासून सुटका 
माहीम रेती बंदर परिसरातील बांबूच्या दुकानांमुळे तो परिसर बांबूचा परिसर म्हणून ओळखला जात होता. तिथे पसरलेली अस्वच्छता व दुर्गंधीमुळे माहीम चौपाटीचे नाव लोप पावत चालले होते; मात्र हा परिसर नयनरम्य बनवून पर्यटनस्थळ करण्यासाठी पालिकेने हाती घेतलेल्या सुशोभीकरणामुळे परिसर निसर्गरम्य तर होईलच; शिवाय अतिक्रमणही हटवले जाईल. 

बकाल झालेला चौपाटीचा परिसर साफ केला आहे. काही सुरूची झाडे लावण्यात आली आहेत. वाळू टाकण्याचे कामही सुरू आहे. माहीम चौपाटीच्या सुशोभीकरणासाठी एकूण चार कोटी खर्च येणार आहे. 
- किरण दिघावकर, सहायक आयुक्त, जी-उत्तर विभाग 

पालिकेने राबवलेला उपक्रम स्तुत्य आहे. चौपाटी सुशोभित होऊन नगरिकांना मोकळी हवा घेता येईल. 
अनेक पर्यटक या ठिकाणी येतील. 
- राजेश पाटील, स्थानिक रहिवासी 

माहीम चौपाटीवर होत असलेला प्रकल्प चांगला आहे. त्यामुळे इथे अतिक्रमण होणार नाही. रहिवाशांसाठी प्रकल्प नक्कीच उपयुक्त ठरेल. 
- संतोष सुर्वे, स्थानिक रहिवासी 

(संपादन- बापू सावंत)
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT