मुंबई

थंडगार बीयरचा प्याला घटला; दीड कोटी लिटरने विक्री कमी

प्रशांत कांबळे

मुंबई : राज्यात बीयरच्या विक्रीत सव्वादोन टक्के घट झाली आहे. 2014-15 मध्ये 31 कोटी 28 लाख लिटर बीयर रिचवली गेली; मात्र पाच वर्षांच्या तुलनेत एक कोटी 40 लाख लिटरने विक्री कमी झाली आहे. 2018-19 मध्ये राज्यात बीयरची केवळ 29 कोटी 88 लाख लिटर विक्री झाल्याची नोंद राज्य उत्पादन शुल्क विभागात झाली आहे. मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यात मात्र बीयरच्या विक्रीत वाढ झाल्याची दिसून येते. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील प्रमुख पाच शहरांचा विचार करता बीयरची सर्वाधिक विक्री मुंबई उपनगर आणि पुणे जिल्ह्यात झाली आहे. मुंबई उपनगरात 2014-15 मध्ये पाच कोटी 18 लाख लिटर बीयरची विक्री झाल्याची नोंद आहे, तर 2018-19 मध्ये पाच कोटी 61 लाख लिटर बीयर रिचवली गेली. दुसऱ्या क्रमांकावरील पुणे जिल्ह्यात 2014-15 मध्ये चार कोटी 43 लाख लिटर बीयरची विक्री झाली होती, तर 2018-19 मध्ये चार कोटी 99 लाख लिटर विक्रीची नोंद आहे. नागपुरात 2018-19 मध्ये 98 लाख लिटर बीयर विकली गेली. 2014-15 मध्ये येथे 89 लाख लिटर विक्री झाली होती. 

बीयरची राज्यातील विक्री 

वर्ष ः खप (लिटरमध्ये) 
2014-15 ः 31 कोटी 28 लाख 58 हजार 
2015-16 ः 32 कोटी 84 लाख 3 हजार 
2016-17 ः 32 कोटी 48 लाख 43 हजार 
2017-18 ः 27 कोटी 60 लाख 38 हजार 
2018-19 ः 29 कोटी 88 लाख 26 हजार 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DA Hike: आठव्या वेतन आयोगात पुन्हा DA वाढणार? केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर काय होणार परिणाम?

Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांविरोधात याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा इशारा |

अजय देवगनला भेटलो नाही, पण... 'दृश्यम ३' पाहून पहिल्या भागातच मेलेला सॅम म्हणतो- मी सिनेमात जिवंत असतो तर...

IPL 2027 Cricket News: दिल्ली कॅपिटल्सने नव्या मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली! 'दादा' कर्णधाराच्या Video ने प्रतिस्पर्ध्यांची झोप उडवली

Marathi News Live Updates: नवी मुंबई विमानतळावरून पुणे, मुंबईसह विविध शहरांसाठी वाहतूक सुविधा वाढणार; सात ऑक्टोबरपासून इलेक्ट्रिक बससेवा सुरू

SCROLL FOR NEXT