Aryan Khan Sakal
मुंबई

आर्यन खान तुरुंगाबाहेर येण्याआधीच्या कायदेशीर प्रक्रिया समजून घ्या...

आर्थर रोड कारागृहाबाहेर एक बॉक्स आहे. त्यामध्ये मानशिंदेंची टीम सुटकेचा आदेश आणि बाँड पेपर्स टाकतील.

दीनानाथ परब

मुंबई: कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात (drug case) आर्यन खानला (aryan khan) काल मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) जामीन मंजूर केला. मागच्या २६ दिवसांपासून आर्थररोड कारागृहात बंद असलेल्या आर्यनची आज किंवा उद्या सुटका होऊ शकते. पण ही सुटका होण्याआधी काही कायदेशीर प्रक्रियांचे पालन करावे लागणार आहे. आर्यनच्या जामिनाच्या आदेशाची (bail order) प्रत मिळाल्यानंतर सर्वप्रथम ती एनडीपीएस कायद्यातंर्गत विशेष कोर्टात सादर करावी लागेल. कारण एनसीबीकडे आर्यन खान आणि अन्य आरोपींची कोठडी आहे.

न्यायाधीश सांब्रे जामिनाच्या आदेशात काही कॅश बाँडही ठोठावू शकतात. जामिनाची ही प्रक्रिया सर्वात आधी सत्र न्यायालयात पूर्ण होईल. त्यानतंर एनडीपीएस कोर्ट संबंधित जेल यंत्रणेला आर्यनच्या सुटकेसाठी आदेश जारी करेल. आर्थर रोड कारागृहाबाहेर एक बॉक्स आहे. त्यामध्ये मानशिंदेंची टीम सुटकेचा आदेश आणि बाँड पेपर्स टाकतील.

शुक्रवारी संध्याकाळी ५.३० आधी ही प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे. कारण त्यावेळी बॉक्स शेवटचा रिकामा होतो. सर्व कागदोपत्रांची प्रक्रिया वेळेवर पूर्ण झाली, तर तुरुंग प्रशासन सुटकेची तयारी सुरु करेल आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत आर्यन खान तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. कशामध्येही विलंब लागू नये, यासाठी सतीश मानशिंदेंची कायदेशीर टीम आपल्याबाजूने सर्व प्रयत्न करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharmendra Pradhan: पेपरफुटीविरोधात आंदोलन करताना धर्मेंद्र प्रधानांना झाली होती मारहाण, १९९७ चा किस्सा पुन्हा चर्चेत!

Sikkim Tunnel Collapse : सिक्कीममध्ये बोगद्यात भूस्खलन २२ जणांचा मृत्यू, बचावकार्य सुरू; पोलिस अधिक्षकांनी दिली माहिती

Latest Marathi Update : भाजपकडून बाहेरून गुंड पाठवून आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न : अभिजीत दिपके

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार सुरूच, लोकल सेवेवर परिणाम; पालघरमध्ये पूरस्थिती, शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

घरातील हिरवाई : स्फूर्तीचा झरा

SCROLL FOR NEXT