Belapur building collapse Esakal
मुंबई

Belapur Building Collapsed: सलून चालकाला जाग आली अन् वाचले शेकडो प्राण! बेलापूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली

Belapur Building Accident: घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाची जवान दाखल झाले असून बचाव कार्याला सुरूवात केली आहे.

आशुतोष मसगौंडे

बेलापूरमधील फणस पाडा परिसरात आज पहाटे 5 वाजण्याच्या 3 मजली इमारत कोसळली असून, त्याखाली अनेकजण दबल्याची भीती आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशामक दलाची जवान दाखल झाले असून बचाव कार्याला सुरूवात केली आहे.

दरम्यान ही दुर्घटना घडण्याआठी काही लोकांनी इमारतीतल रहिवाशांना सावध करत बाहेर काढल्याने मोठी जीवितहानी टळली असली तरी कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही लोक अडकल्याची भीती आहे.

दरम्यान ही दुर्घटना सीबीडी बेलापूर परिसरातील शहाबाज गावात घडली आहे. या 3 मजली रहिवासी इमारतीत तळमजल्यावर एक सलून आहे. शनिवारी पहाटे ५ च्या सुमारास सलूनचालकाला अचानक इमारत हलत असल्याचे जाणवल्यानंतर त्याने आरडाओरड सुरू केली. त्यानंतर परिसरातील नागरिक तेथे गोळा झाले आणि त्यांनी इमारतीतील सर्व मजल्यांवरील रहिवाशांना तातडीने बाहेर काढले.

शहाबाज गावात इमारत कोसळल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.

महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी सांगितले की, "पहाटे पाचच्या सुमारास इमारत कोसळली. ही G+3 इमारत आहे. हे गाव बेलापूर प्रभागांतर्गत येते. इमारतीत 13 फ्लॅट होते. दोन जणांना वाचवण्यात यश आले असून दोन जण अडकल्याची शक्यता आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी आहे. बचावकार्य सुरू आहे. बचावलेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे."

कैलास शिंदे यांनी पुढे सांगितले की, "ही 10 वर्षे जुनी इमारत असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी सांगितले. तपास चालू आहे. इमारतीच्या मालकावर कारवाई केली जाईल."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

दैव की कर्म?

आजचे राशिभविष्य - 24 ऑगस्ट 2025

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 24 ऑगस्ट 2025

टेबल टेनिसमध्ये भारताला ऑलिंपिक पदकाची आशा

SCROLL FOR NEXT