मुंबई

Mumbai Local News: पनवेल उरण लोकलसाठी प्रवासी आग्रही; सुरु झाल्यास...

Panvel News: त्या मुळेच पनवेल वरून थेट उरण लोकल सुरू करावी अशी मागणी येथील जेएनपिटी बंदरात काम करणार्या नागरिकांनी केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Local News: बहुचर्चित बेलापुर उरण लोकल सेवा सुरू झाल्याने उरण परिसर नवी मुंबई शहराशी जोडला गेला आहे. परंतु हिच सेवा पनवेल पर्यंत असावी व पनवेल उरण रेल्वे सुरू करावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

बेलापूर- उरण दरम्यान ता.12 जानेवारीपासून लोकल धावायला सुरवात झाली. गेल्या कित्येक वर्षभरापासून रखडलेली उरण ते बेलापूर लोकल सेवा अखेर सुरु झाली आहे. अनेक दिवसांपासून उरण शहरात मुंबई लोकल सेवा पुरवण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. नवी मुंबईच्या स्थापनेनंतर अनेक दशकांपूर्वी सीएसएमटी ते बेलापूर लोकल सेवा सुरू करण्यात आली.

मात्र, बेलापूरपासून उरण असा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते. यामुळे बेलापूर ते उरण अशी लोकल सुरु करण्यात यावी, अशा मागणींनी जोर धरला होता. यानंतर मुंबई लोकल प्रशासनाने बेलापूर उरण अशी लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला. अखेर ता. 12 जानेवारी रोजी सीएसएमटी ते उरण लोकल सेवा सुरु झाल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

परंतु जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व परिसरात असलेले उद्योगधंदे या मध्ये पनवेल मधून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ काम करत आहे. या मध्ये ड्रायव्हर माथाडी पासून ते वरिष्ठ अधिकार्यांची संख्या हजारोंच्या घरात आहे. पनवेल मधून थेट पळस्पा जेएनपिटी मार्गावर पब्लिक ट्रान्सपोर्ट ची व्यवस्था नसल्याने पनवेल परिसरातील नागरिकांना उरण ला जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे.

कंटेनर यार्ड मधील कामगारांना गट करून खाजगी वाहनाने कर्तव्याच्या ठिकाणी जावे लागत असल्याने त्यांचा वेळ व पैशाचा अपव्यय होत आहे. तसेच बहुतेक कामगार हे दोन दोनच्या संखेने आपल्या मार्गानुसार दुचाकीवरून जात आहेत. सद्यःस्थितीत पळस्पे न्हावाशेवा महामार्गाचे काम पूर्ण झाल्याने हा मार्ग वेगवान झाला आहे. त्या मुळे या मार्गावर नेहमी दुचाकी व चारचाकीचे भीषण अपघात होऊन आजतागायत शेकडो कामगारांचे प्राण गेले आहेत. त्या मुळेच पनवेल वरून थेट उरण लोकल सुरू करावी अशी मागणी येथील जेएनपिटी बंदरात काम करणार्या नागरिकांनी केली आहे.

जेएनपिटी ला कामावर जाण्यासाठी पनवेल परिसरातील कामगार व अधिकार्यांची मोठ्या प्रमाणावर ससे होलपट होत आहे. उरण थेट नवी मुंबई व मुंबई ला जोडला तसाच पनवेल ला जोडावा अशी रेल्वे प्रशासनाकडे विनंती आहे.

नितिन घाडगे, अधिकारी कंटेनर यार्ड जेएनपिटी

रस्ते प्रवासापेक्षा रेल्वे प्रवास सुखकर आणि स्वस्त आहे. चाकरमान्यांना उरण परिसरात नोकरी, व्यवसायासाठी नवी मुंबई व मुंबई मधून जाणे स्वस्त झाले आहे. त्याच धर्तीवर पनवेल करांचाही प्रवास सुखकर व स्वस्त व्हावा.

संजय जाधव, क्लिअरिंग ऑन्ड फॉरवर्ड कामगार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaishvary Thackeray: बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची सायबर फसवणूक, एकाच रात्रीत सहा वेळा संशयास्पद व्यवहार; परदेशातून घडली घटना

Khadakwasla Dam Water Level : खडकवासला धरणसाखळीत 80.19 टक्के पाणीसाठा; पवना, मुळशी धरणात किती पाणी? पुण्यावर ओढवणार पाणीकपातीचं संकट?

Vande Bharat Sleeper: मुंबई-नागपूर वंदे भारत स्लीपर कधी धावणार? मुंबई-बंगळुरूला मिळाली हिरवा झेंडा ;उपराजधानीची उपेक्षाच

Latest Marathi News Live Update : जळगावात खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीत गोळीबार; विद्यार्थ्यांची धावपळ

Sangli District Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या विजयी उमेदवारांची यादी; गोपीचंद पडळकर, संजय काका पाटलांचा जिल्हा बँकेत प्रवेश

SCROLL FOR NEXT