माथेरान : बेलवेडीयर पॉईंटवर संरक्षक कठडा बांधण्यात आला आहे.  
मुंबई

माथेरानचे बेलवेडीयर पॉईंट अखेर सुरक्षित

सकाळ वृत्तसेवा

माथेरान (बातमीदार) : येथील बेलवेडीयर पॉईंटला संरक्षक कठडे नव्हते. त्यामुळे तो पर्यटकांसाठी असुरक्षित होता. चार महिन्यांपूर्वी एका पर्यटक महिलेचा या पॉईंटवरून पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे वन-व्यवस्थापन समितीला जाग आली असून या पॉईंटवर लोखंडी रेलिंग बसवण्यात आले आहे. 

बेलवेडीयर पॉईंटला सुरक्षा कठडे बसवण्यासाठी वन विभाग आणि वन-व्यवस्थापन समितीला माथेरान सनियंत्रण समितीची परवानगी घ्यावी लागली. ती मिळताच वन-व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश जाधव आणि वनक्षेत्रपाल नारायण राठोड यांनी वन-व्यवस्थापन समितीच्या अखत्यारित असलेल्या पार्किंगच्या उत्पन्नातून 3 लाख 50 हजार खर्च करून 35 फूट लांब लोखंडी संरक्षक कठडा बांधण्यात आला आहे. 

झुडपे वाढली

बेलवेडीयर पॉईंटवरून मोरबे धरण, प्रबळगड, इर्शाळगडसह रसायनी, पनवेल तालुक्‍यातील परिसर दिसतो. अनेक वर्षे हा पॉईंट बंद होता. त्यामुळे परिसरात झुडपे वाढली होती. 

बेलवेडीयर पॉईंटवर संरक्षक कठडा नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यटक कमी प्रमाणात जात होते. संरक्षक कठडा बांधल्यानंतर येथील झुडपे हटवून रस्ता तयार केला आहे. हे काम पूर्ण होताच वन-व्यवस्थापन समितीचे सदस्य नितीन सावंत यांनी पाहणी केली. 
- योगेश जाधव, अध्यक्ष, वन-व्यवस्थापन समिती 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Commission of India : एसआयआरवरून निवडणूक आयोगातच मतभेद; दोन आयुक्तांनी दहा महिन्यांत १४ वेळा नोंदवले आक्षेप

'काही वाईट असेल ते माझ्याबाबत होऊ दे' बहिणीच्या प्रीमॅच्युअर बाळासाठी जुईची खाटूश्यामबाबांकडे प्रार्थना, अनुभव सांगत म्हणाली...

Asian Games 2026 : क्रिकेटची आवड असलेल्या Jay Meena ने इतिहास रचला! भारताला सॉफ्ट टेनिसमध्ये जिंकून दिले पहिले आशियाई पदक... जाणून घ्या कोण आहे तो?

Marathi News Live Updates : जम्मू-काश्मीरमधील गँगस्टर करनजीत गुग्गाला दिल्लीत अटक

Gold Rate Today: दसऱ्याआधी सोनं स्वस्त! सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण; तुमच्या शहरात ताजा भाव पाहा

SCROLL FOR NEXT