mumbai best bus depot sakal
मुंबई

Mumbai News : बेस्टमधील २७ आगारातील 57 शौचालयांची स्थिती दयनिय; दुरूस्ती करण्याची केली मागणी

बेस्ट उपक्रमातील 57 आगारातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. त्यात महिलांसाठी असलेल्या स्वच्छता गृहाची अवस्था वाईट असल्याचे निदर्शनास आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बेस्ट उपक्रमातील 57 आगारातील स्वच्छतागृहांची दुरावस्था झाली आहे. त्यात महिलांसाठी असलेल्या स्वच्छता गृहाची अवस्था वाईट असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे.

अऩेक क्षेत्रांमध्ये महिला आघाडीवर आहेत. मात्र महिलांसाठी योग्य त्या सोयीसुविधा त्या-त्या क्षेत्रांमध्ये नाहीत. मुंबई कॉंग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी महिलांच्या सुविधांकडे लक्ष वेधले. अग्निशन दलाच्या आणि बेस्ट उपक्रमातील महिलांना सुविधा नाहीत. सद्या असलेल्या सुविधा अपू-या आहेत. बेस्ट उपक्रमाच्या आगारांमध्ये स्वच्छता गृहाची स्थिती दयनिय आहे.

बेस्टच्या कर्मचा-यांसाठी असलेली स्वच्छता गृहे अस्वच्छ आहेत. त्यांची स्वच्छता निट ठेवली जात नाही. त्यामुळे स्वच्छता गृहामध्ये दुर्गंधी असते. त्यामुळे कर्मचा-यांना रोगराई होण्याची भिती आहे. आगारांमध्ये महिलांसाठी असलेल्या स्वच्छता गृहांची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. त्यांची तातडीने दुरूस्ती करा अशी मागणी त्यांनी केली आहे.

बेस्टच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व चौक्या, बस आगार या ठिकाणी महिलांसाठी सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने उपापयोजना करा अशी मागणी गायकवाड यांनी केली. बेस्ट प्रशासनाला स्वच्छता गृहांची सुधारणा करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाला राज्य सरकारने दिले आहेत. बेस्टमध्ये एकूण ५ हजार ७४३ कंत्राटी चालक आहेत. वाहक १ हजार १९५ आहेत. एकूण ७ हजार २८० पैकी १४२ महिला त्याठिकाणी कार्यरत आहेत.

सर्व महिलांना सुरक्षा देणे ही सरकारची आणि बेस्टची जबाबदारी आहे. मुंबईचे २७ आगार आहेत त्यात ५७ शौचालये ही पुरुषांसाठी व महिलांसाठी ३० स्वतंत्र शौचालये आहेत. त्या शौचालयांमध्ये काही त्रुटी असतील त्या त्रुटी दूर करण्याचे आदेश बेस्ट प्रशासनाने दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20I World Cup 2026: भारताचा सराव सामन्यात दमदार विजय; राधा-श्रेयंकाच्या गोलंदाजीसमोर वेस्ट इंडिजने टेकले गुडघे

Philippines earthquake: फिलिपिन्समध्ये ७.८ रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप! ३२ जणांचा मृत्यू, दोनशेंपेक्षा अधिक जखमी

Kalyan: कल्याणमध्ये मोठा राडा! टोळक्याकडून रिक्षाचालकाला मारहाण; घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Visakhapatnam: स्टील प्लांटमध्ये मोठा अपघात! वितळलेलं स्टील कामगारांच्या अंगावर पडलं; ८ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

IND vs AFG: भारताविरुद्ध आऊट नसतानाही अफगाणिस्तानचा खेळाडूनं सोडलं मैदान अन् मग संघसहकाऱ्यांशीस झाला वाद; नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT