Best Bus sakal
मुंबई

Best Bus : 'बेस्ट'चा स्वमालकीच्या बसेस घेण्याचा विचार

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४,५०० बसेस होत्या. मात्र हा ताफा आता ३,१०० वर आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - बेस्ट बसेसची संख्या कमी होत असल्या तरी प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह बेस्टच्या मालकीच्या बसेस घेण्याचा विचार सुरु असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ४,५०० बसेस होत्या. मात्र हा ताफा आता ३,१०० वर आला आहे. त्यामुळे प्रवासी संख्येत घट झाली आहे. प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासह बेस्टच्या ताफ्यात वाढ करण्यात येणार आहे. बस ताफ्यात वाढ करताना अधिकाधिक बसेस बेस्टच्या मालकीच्या असतील यावर भर देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

बेस्टला बस पुरवठा करणारे सध्या ७ विविध कंत्राटदार आहेत. यापुढेही विविध कंत्राटदारांमार्फत बस ताफ्यात येणार आहेत. मात्र या कंत्राटदारांचे विविध अनुभव बघता, या कंत्राटदारावर पूर्णपणे विसंबून राहणे शक्य नाही. त्यामुळे कंत्राटदारांच्या बसेस व स्वमालकीच्या बस यात समतोल राहावा म्हणून लवकरच स्वमालकीच्या बस घेण्यासाठी विचार सुरु असून लवकरच याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

चलो अँप फेरआढावा

चलो अँप प्रवाशांच्या पसंतीस उतरले असून बेस्ट उपक्रमाला या अँपमुळे कुठलेही उत्पन्न मिळत नाही. तरीही चलो अँपला एवढे प्रोत्साहन का दिले जाते, याचा अभ्यास बेस्ट करणार असल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT