बोलबच्चन गॅंग बेमालूमपणे लुटते
बोलबच्चन गॅंग बेमालूमपणे लुटते 
मुंबई

गॅंग्ज अ़ॉफ मुंबई : बेमालूमपणे लुटते बोलबच्चन गॅंग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘पुढे नाकाबंदी सुरू आहे. आम्ही पोलिस आहोत. तुमच्या अंगावरचे सोने काढून पिशवीत ठेवा... ’, ‘मावशी, पुढे गरिबांसाठी मोफत साड्या वाटप सुरू आहे. आम्ही तुम्हाला तेथे घेऊन जातो; पण गरीब दिसायचं तर अंगावर दागिने नकोत. ते पिशवीत काढून ठेवा...’ असे सांगून स्त्रियांना फसवून त्यांचे दागिने अलगद पळवण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत. यापूर्वीच्या अशा असंख्य तक्रारींच्या नोंदी पोलिस ठाण्यात सापडतील. केवळ बोलण्याची कला वापरून हे ठग नागरिकांना लुटत असल्याने त्यांची टोळी ओळखली जाते ‘बोलबच्चन गॅंग’ म्हणून. 

मोठ्या शहरांमधील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये परदेशी राहणाऱ्या मुलांचे वृद्ध पालक, लग्न सोहळ्याची ठिकाणे, दागिने घालणाऱ्या महिला हे बोलबच्चन टोळीचे मुख्य लक्ष्य असते. ठाण्यात काही महिन्यांपासून ही टोळी सक्रिय झाली होती. नौपाड्यातील अशाच एका गुन्ह्याचा तपास करताना ठाणे गुन्हे शाखेच्या हाती राजू शेट्टी हा ठग लागला. त्याच्या चौकशीतून समजले, की तोच अशा एका टोळीचा म्होरक्‍या होता. ठाण्यातील खोपट, राम मारुती रस्ता, प्रजापिता ब्रह्मकुमारी चौक आणि ठाणे स्टेशन रोडवर भानुशाली हॉस्पिटलसमोर अशा पाच ठिकाणी ही टोळी सक्रिय होती.

गुन्ह्याची ठिकाणे
शक्‍यतो कमी गर्दीचे ठिकाण किंवा निर्जन स्थळ. लग्नकार्य आदी समारंभांचे ठिकाण. शहारांपासून लांब असलेली कमी वर्दळीची गृहसंकुले.

गॅंगची कार्यपद्धत 
दुपारी तसेच रात्री ज्येष्ठ नागरिक किंवा दागिने घातलेल्या महिलांचा मागोवा घेणे. लक्ष्य सापडताच त्यांना आपण या ठिकाणचे नगरसेवक आहोत, पोलिस आहोत, अशा बतावण्या करत एवढे दागिने घालून या परिसरात वावरणे असुरक्षित आहे. त्यामुळे दागिने काढून पिशवीत ठेवा, असा सल्ला देणे. दागिने काढून ठेवल्यावर गप्पांच्या ओघात ते पळवणे. पुढे काही अंतरावर बाईकवर त्यांचे साथीदार असतात. त्यांच्या मदतीने पसार होणे. बोलबच्चन गॅंगची ही कार्यपद्धती. अत्यंत गोड बोलून विश्‍वास संपादन करत मोठ्या चातुर्याने हे ठग आपल्याकडील ऐवज लंपास करतात

अशी घ्या काळजी...
प्रथम आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. त्यावर लक्ष ठेवा. कमी वर्दळीच्या ठिकाणांवरून प्रवास करताना दागिन्यांचा वापर शक्‍यतो टाळावा. दागिने परिधान केले असल्यास सावधगिरीने प्रवास करा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवू नका.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Brij Bhushan Singh: भाजपनं ब्रिजभूषण सिंहचं तिकीट कापलं! पण मुलाला दिली उमेदवारी; रायबरेलीचाही उमेदवार जाहीर

Prajwal Revanna: "रेवन्ना प्रकरणी प्रधानमंत्र्यांनी 'त्या' पीडित महिलांची माफी मागावी"; राहुल गांधींची मागणी

Naach Ga Ghuma: बॉक्स ऑफिसवर 'नाच गं घुमा'चा धुमाकूळ; ओपनिंग-डेला केली इतकी कमाई

Fridge Tips : उन्हाळ्यात फॅनला जसा आराम देतो तसा फ्रीजलाही द्यावा का? 1-2 तास बंद ठेवला तर फायदा होतो की नुकसान?

Auto-Brewery Syndrome : एक घोटही न पिता हा माणूस असतो टल्ली.. याचं शरीरच तयार करतं अल्कोहोल! जडलाय विचित्र आजार

SCROLL FOR NEXT